संजय जाधव म्हणतायेत, पुढच्या वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार माझे 'हे' चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 12:39 IST2016-12-27T17:38:54+5:302016-12-28T12:39:15+5:30

प्राजक्ता चिटणीस दिग्दर्शक संजय जाधव यांनी फू बाई फू या कार्यक्रमाचे काही वर्षांपूर्वी परीक्षण केले होते आणि आता ते ...

According to Sanjay Jadhav, the audience will see my 'This' film next year | संजय जाधव म्हणतायेत, पुढच्या वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार माझे 'हे' चित्रपट

संजय जाधव म्हणतायेत, पुढच्या वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार माझे 'हे' चित्रपट

ong>प्राजक्ता चिटणीस
दिग्दर्शक संजय जाधव यांनी फू बाई फू या कार्यक्रमाचे काही वर्षांपूर्वी परीक्षण केले होते आणि आता ते टू मॅड या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहेत. त्यांच्या या परीक्षणाच्या अनुभवाबद्दल आणि त्यांच्या एकंदर वाटचालीबद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

तुम्ही एक निर्माते, दिग्दर्शक आहात, चित्रपटांच्या हिट आणि फ्लॉप होण्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहाता?
एक दिग्दर्शक, निर्माता म्हणून तुम्ही तुमची मेहनत करतच असता. पण चित्रपट हिट होणे अथवा फ्लॉप होणे तुमच्या हातात नसते. तुमच्या होणाऱ्या चुकांमधून तुम्हाला शिकायचे असते. केवळ एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करू नये याची काळजी घ्यावी लागते आणि तुमचा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतरच तुमच्या जवळची खरी माणसे कोण आहेत हे तुम्हाला ओळखायला मिळते. 

तुमचा टू मॅडचा अनुभव कसा आहे आणि या कार्यक्रमात तुम्ही खूप मजा-मस्ती करता आहात असे कळले आहे, ते खरे आहे का?
मी याआधी फू बाई फू या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत बसलो आहे. त्यामुळे परीक्षण करणे हे माझ्यासाठी नवीन नाही. केवळ तो एक कॉमेडी कार्यक्रम होता आणि हा एक डान्स रिअॅलिटी शो आहे. या कार्यक्रमाच्या ऑडिशनला एकापेक्षा एक सरस नृत्य करणारे लोक आले होते. त्यामुळे त्यांच्या नृत्याचे परीक्षण करणे हे खूपच कठीण गेले होते. पण मी, अमृता खानविलकर आणि उमेश जाधव यांनी मिळून सगळ्यात चांगले डान्सर लोकांच्या समोर आणले आहेत. या कार्यक्रमात मी खूप मजा-मस्ती करतो हे खरे आहे. कारण या कार्यक्रमात येणाऱ्या अनेक मुलांचे केस खूप मोठे असतात. त्यांना पाहून खरे तर मला खूप वाईट वाटते आणि हे मी अनेकवेळा कार्यक्रमात बोलूनही दाखवतो. कारण माझे केस हा माझा वीक पॉईंट आहे. आता तर यावरून मला स्पर्धकदेखील चिडवायला लागले आहेत. माझ्यासाठी एका स्पर्धकाने चक्क विगदेखील आणला होता. 

दिग्दर्शन करणे आणि परीक्षण करणे याच्यात तुम्हाला काय फरक जाणवतो?
तुम्ही चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना एखादी गोष्ट तुमच्याकडे असते आणि ती गोष्ट तुम्हाला लोकांना सांगायची असते. पण रिअॅलिटी शोमध्ये नृत्य करताना स्पर्धक त्याच्या नृत्यातून एक गोष्ट तुम्हाला सांगत असतो या गोष्टीचे तुम्हाला परीक्षण करायचे असते. स्पर्धक गोष्ट योग्यप्रकारे लोकांपर्यंत पोहोचवतो की नाही हे तुम्हाला ठरवायचे असते. हा एकच फरक मला दिग्दर्शन आणि परीक्षण करण्यात जाणवला.

पुढील वर्षांत तुमचे चार चित्रपट येणार आहेत, हे खरे आहे का?
सध्या मी चार चित्रपटांच्या पटकथेवर काम करत आहे. माझ्या मनाला भिडेल अशीच गोष्ट लोकांसमोर मांडायची असे मी ठरवले आहे. माझे चारही चित्रपट एकमेकांपेक्षा खूपच वेगळे आहेत. पण प्रेक्षकांना हे चारही चित्रपट आवडतील अशी मला खात्री आहे. 

 

Web Title: According to Sanjay Jadhav, the audience will see my 'This' film next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.