ये है मोहब्बतेच्या सेटवर अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 17:39 IST2016-06-07T12:09:41+5:302016-06-07T17:39:41+5:30
ये है मोहोब्बते या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी या मालिकेत निधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पवित्रा पुनिया हिला अपघात झाला आहे. या ...

ये है मोहब्बतेच्या सेटवर अपघात
य है मोहोब्बते या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी या मालिकेत निधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पवित्रा पुनिया हिला अपघात झाला आहे. या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी पुनियाने हीलची चप्पल घातली होती. तिची हील कॅमेऱयाच्या ट्रॉलीत अडकली आणि त्यामुळे तिच्या पायाला जबर दुखापत झाली. तिला झालेल्या दुखापतीमुळे तिचा पाय चांगलाच ठणकत होता. त्यामुळे डॉक्टरांनी काही दिवस तिला आराम करायला सांगितले आहे. पण मालिकेच्या चित्रीकरणात व्यत्यय येऊ नये म्हणून दोन-तीन दिवसांत पुन्हा चित्रीकरण करण्याचे पवित्राने ठरवले आहे.