'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतून राजवीर आणि मयूरीची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 06:31 PM2023-07-11T18:31:47+5:302023-07-11T18:33:37+5:30

 अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहे.

Abol pritichi ajab kahani marathi new serial on sony marathi from 17th july | 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतून राजवीर आणि मयूरीची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतून राजवीर आणि मयूरीची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे.  तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मयूरी असून ती या मालिकेत बॉडीगार्डच्या वेशातसुद्धा  पाहता येणार आहे. आता या दोघांची अजब प्रेमकहाणी कशी असेल, हे लवकरच पाहायला मिळेल. ही 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' लपूनछापून कशी फुलतेय, हे पाहायला मिळेल.

 अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याचे याआधीचे काम प्रेक्षकांना विशेष आवडले. त्याच्या नव्या भूमिकेची त्याचे चाहते मनापासून वाट पाहत होते. अजिंक्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेतून दिसणार आहे. मालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडतो आहे, कारण मालिकेची नायिका जान्हवी तांबट ही वेगळ्या रूपात दिसते आहे. ती चक्क एका बॉडीगार्डच्या वेशात आपल्याला दिसते आहे, तेही पुरुष बॉडीगार्डच्या वेशात. जान्हवी साठी मयुरी आणि भाऊसाहेब या दोन व्यक्तिरेखा साकारणं हे तारेवरची कसरत ठरणार आहे. 

आता हा बॉडीगार्ड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. या मालिकेतून दिग्गज कलाकारांची फळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजिंक्य राऊत, जान्हवी तांबट, सुनील तावडे आणि दीप्ती केतकर हे कलाकार प्रमुख भूमिकांत या मालिकेतून पाहायला मिळतील. अजय मयेकर हे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. सोनी मराठीवर 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका १७ जुलैपासून संध्याकाळी ७.३० वाजता  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Abol pritichi ajab kahani marathi new serial on sony marathi from 17th july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.