अभिनयक्षेत्रात संयम राखणे गरजेचे ः शिवानी तोमर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 17:43 IST2017-06-15T12:13:36+5:302017-06-15T17:43:36+5:30

इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत शिवानी तोमर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. इस प्यार को क्या नाम ...

Ability to maintain patience in acting: Shivani Tomar | अभिनयक्षेत्रात संयम राखणे गरजेचे ः शिवानी तोमर

अभिनयक्षेत्रात संयम राखणे गरजेचे ः शिवानी तोमर

प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत शिवानी तोमर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेच्या यशानंतर या कार्यक्रमाचा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. पहिल्या सिझनमध्ये सान्या इराणी नायिकेच्या भूमिकेत झळकली होती. पण आता शिवानीची या मालिकेत वर्णी लागली आहे. या मालिकेच्या निमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पा...

शिवानी आज तू छोट्या पडद्यावर तुझे चांगलेच नाव कमावले आहेस, तुझा हा अभिनयप्रवास कसा सुरू झाला?
अनेकजण लहानपणापासूनच अभिनेता अथवा अभिनेत्री बनवण्याचे ठरवतात. पण मी लहान असताना अभिनयाचा कधीच विचार केला नव्हता. पण शाळेत असताना तसेच कॉलेजमध्ये असताना मी नाटकांमध्ये काम करायला लागले आणि या क्षेत्राविषयी माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. कॉलेजमध्ये असताना मी अभिनेत्री बनण्याचे ठरवले. मी अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईत आले आणि त्यानंतर मला काही मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी हम आपके घर में रहते है या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली.

या क्षेत्रात तुझे कोणीही गॉडफादर नसल्यामुळे तुझा प्रवास खूप कठीण होता का?
मी मुंबईत आले, त्यावेळी मी या क्षेत्रातील कोणालाच ओळखत नव्हते. पण काहीही करून या क्षेत्रात करियर करायचे असे मी ठरवले. मला खूपच स्ट्रगल करायला लागला होता. मी किती ऑडिशन्स दिल्या हे मला आज आठवत देखील नाही. अनेकवेळा मला अपयश देखील मिळाले. पण तरीही मी संयम राखला आणि आज त्यामुळेच मला इथपर्यंत पोहोचता आले असे मला वाटते. 

इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत तुझी भूमिका काय असणार आहे?
इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेत मी चांदनी ही भूमिका साकारत आहे. अलाहाबादमध्ये राहाणारी ही अतिशय साधी मुलगी आहे. या मालिकेतील माझा लूकदेखील खूप वेगळा असणार आहे. चांदनी ही व्यक्तिरेखा हिंदी भाषेसोबतच काही वेळा संस्कृत भाषेत बोलताना देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

तू या मालिकेसाठी भगवद्गीताचे श्लोक शिकले आहेस, हे खरे आहे का?
मी माझ्या लहानपणी भगवद्गीतेतले श्लोक वाचले होते. पण मला ते श्लोक तितकेशे आठवत नव्हते. या मालिकेत मला त्यातील काही श्लोक बोलायचे आहे हे मला कळल्यावर मी भगवद्गीता पुन्हा वाचली. आता तर यातील काही श्लोक माझे तोंडपाठ झाले आहेत. 

Web Title: Ability to maintain patience in acting: Shivani Tomar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.