नवरा असावा अभिनेता...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2016 19:40 IST2016-12-09T19:36:37+5:302016-12-09T19:40:00+5:30

सतीश डोंगरे 'अभिनेता नवरा नसावा' असे उघडपणे सांगणाºया अभिनेत्री नेहा पेंडसे हिचा आता मात्र विचार बदलला आहे. कारण तिला इंडस्ट्रीमधील ...

Aapara Aasava actor ...! | नवरा असावा अभिनेता...!

नवरा असावा अभिनेता...!

<
em>सतीश डोंगरे


'अभिनेता नवरा नसावा' असे उघडपणे सांगणाºया अभिनेत्री नेहा पेंडसे हिचा आता मात्र विचार बदलला आहे. कारण तिला इंडस्ट्रीमधील व्यक्तीशीच लग्न करायचे असून, ‘नवरा असावा अभिनेता’ असे ती म्हणत आहे. त्यासाठी सध्या युद्धपातळीवर शोधमोहीमही सुरू आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नेहाला तिच्या लग्नाबाबत विचारले जात होते. ती सुद्धा इंडस्ट्रीमधील व्यक्तीशी लग्न करणार नसल्याचे जाहीरपणे सांगत असे. कास्टिंग काऊचबाबत बिनधास्तपणे बोलणाºया नेहाला कदाचित याच कारणामुळे इंडस्ट्रीतील व्यक्ती आपला जीवनसखा नसावा असे वाटत असावे. मात्र गेल्या काही महिन्यांत तिच्या विचारात बदल झाला असून, आता ती लाइफ पार्टनरसाठी इंडस्ट्रीमध्येच शोध घेत आहे. असे काय घडले की, नेहाला आयुष्याचा जोडीदार निवडताना आपल्या विचारात बदल करावे लागले. याचीच गुत्थी सोडविण्याचा ‘सीएनएक्स’ने प्रयत्न केला असता, तिने मनमोकळ्या गप्पांमधून याचा उलगडा केला. 

प्रश्न : तू लग्नाबाबतचे विचार बदलले असे ऐकावयास मिळत आहे? 
- होय, हे खरं आहे! सुरुवातीला मी इंडस्ट्रीमधील व्यक्तीशी लग्न करणार नाही, असे ठरविले होते. त्याचे कारण त्या-त्या काळात घडलेल्या घडामोडी असल्याने त्यावर भाष्य करण्यास फार काही तथ्य नाही. जेव्हा मी इंडस्ट्रीबाहेरील व्यक्तींचे स्वभाव, आवडी-निवडी, विचार याचे परीक्षण केले तेव्हा मी या निर्णयावर येऊन पोहचले की, इंडस्ट्रीमधील व्यक्तींशीच लग्न करायला हवे. माझ्या विचारातील हा बदल अलीकडच्या काही महिन्यांत झाला असून, कृपया यातून कोणी चुकीचा अर्थ काढू नये, हेच अभिप्रेत आहे.  

प्रश्न : पुढील काही दिवसांत तुझ्या लग्नाची तिथी कानावर पडू शकते का?
- बापरे, हा विचार मात्र मी अजून केलेला नाही. मी एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करतेय की, वय झाले म्हणून लग्न उरकून घ्यावे अशा विचाराची ना मी आहे, ना माझे आई-वडील. शिवाय माझे कोणाशीही अफेयर नाही. मी सिंगल लाइफ जगत आहे. त्यामुळे लग्नाची तिथी कधी येईल हे सांगणे जरा मुश्किलच आहे. खरं तर या गोष्टी ठरवून घडत नसतात. बºयाचदा अचानकपणेच आयुष्यात असे अनपेक्षित घडून जाते. सध्या मी माझ्या कामात प्रचंड व्यस्त असून, यासाठी माझ्याकडे सध्यातरी वेळ नाही. मात्र अचानकपणे एखाद्यास डेट करण्याची संधी मिळाली तर त्यासाठी मी नक्कीच वेळ काढेल.

प्रश्न : बºयाचशा अभिनेत्री रिअ‍ॅलिटी शोमध्ये परतत आहेत, तुला संधी मिळाल्यास तू रिअ‍ॅलिटी शोमध्ये येण्याचा विचार करशील का?
- होय, कारण मी ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेत काम करीत असल्याने प्रेक्षक मला ‘मॅडम’ या नावाने ओळखत आहेत. परंतु जेव्हा मी रिअ‍ॅलिटी शोमध्ये असेल तेव्हा मला ‘नेहा पेंडसे’ याच नावाने ओळखले जाईल. थोडक्यात रिअ‍ॅलिटी शो स्वत:ची ओळख निर्माण करण्याचे उत्तम व्यासपीठ ठरत आहे. मला एका हिंदी रिअ‍ॅलिटी शोची आॅफरदेखील आली असून, त्याविषयी मी सकारात्मक विचार करीत आहे. 

प्रश्न : मराठीमध्ये परतण्याचा तू विचार करीत आहेस का?
- मराठीमध्ये काम करण्यास सध्या मी खूपच उत्सुक आहे. कारण मी विचारही केला नव्हता एवढ्या आॅफर्स मला मराठीतून येत आहेत. आगामी काळात प्रेक्षकांना मी मराठीमध्ये नकीच बघायला मिळणार आहे. मराठीमधील मालिका तसेच रिअ‍ॅलिटी शो जबरदस्त हिट होत आहेत. मराठीचा प्रेक्षक वाढत असून, मराठी प्रोजेक्टमध्ये काम करणे प्रत्येक अभिनेत्रीला आवडेल. सध्या बºयाचशा इंटरेस्टिंग आॅफर्स येत असल्याने मी खूश आहे. 

प्रश्न : ‘मे आय कम इन मॅडम’मधील तुझा प्रवास कसा सांगशील?
बºयाचशा लोकांना माझा प्रवास मराठी आणि साउथ इंडस्ट्रीपुरताच मर्यादित वाटतो. परंतु आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत सर्वाधिक योगदान मी हिंदीत दिले आहे. १९९०मध्ये आलेल्या ‘हसरते’ या टीव्ही मालिकेतून मी बालकलाकार म्हणून काम केले होते. आता ‘मे आय कम इन मॅडम’ या मालिकेतून मी पुन्हा हिंदीमध्ये एंट्री केली आहे. आज मालिकेला नऊ महिने पूर्ण होतात, परंतु मला अजिबात कंटाळा आलेला नाही. मी मालिका एन्जॉय करीत असून, प्रेक्षकांनादेखील मालिकेतील माझे कॅरेक्टर भावत आहे. 

Web Title: Aapara Aasava actor ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.