आमिर खानचा 'सत्यमेव जयते सिझन 3' लवकरच रसिकांच्या भेटीला,तर शाहरूखचाही हा शो करणार रसिकांचे मनोरंजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 15:18 IST2017-11-29T09:48:25+5:302017-11-29T15:18:25+5:30

बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानने रुपेरी पडद्यावर विविध सिनेमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाच आहे.त्यानंतर रियल लाइफमध्येसुद्धा आमिरची सामाजिक बांधिलकी ...

Aamir Khan's 'Satyamev Jayate Season 3' will soon be hosted by fans, while Shahrukh will also entertain entertainers. | आमिर खानचा 'सत्यमेव जयते सिझन 3' लवकरच रसिकांच्या भेटीला,तर शाहरूखचाही हा शो करणार रसिकांचे मनोरंजन

आमिर खानचा 'सत्यमेव जयते सिझन 3' लवकरच रसिकांच्या भेटीला,तर शाहरूखचाही हा शो करणार रसिकांचे मनोरंजन

लिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानने रुपेरी पडद्यावर विविध सिनेमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाच आहे.त्यानंतर रियल लाइफमध्येसुद्धा आमिरची सामाजिक बांधिलकी पाहायला मिळाली. 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमिरनं विविध प्रथा आणि परंपरा याविरोधात आवाज उठवला.आमिरच्या व्यक्तीमत्त्वाचा हा रियल पैलू रसिकांच्या काळजाला चांगलाच भिडला. त्यामुळे सत्यमेव जयतेच्या दुस-या सिझनला चांगलीच पसंती मिळाली आता पुन्हा एकदा सत्यमेव जयतेचा तिस-या सिझनसाठी आमिर खान सज्ज झाला आहे. मात्र याच दरम्यान बॉलिडूचा बादशाह छोट्या पडद्यावर एंट्री करणार आहे.  टेड टॉक्स इंडिया नयी सोच या शोच्या माध्यमातून शाहरूख खान छोट्या पद्याच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.दोन्ही शो एकाचवेळी सुरू होणार म्हटल्यावर बॉलिवूडमधील मोठे कलाकार शाहरूख खान आणि आमिर खान दोघेही छोट्या पडद्यावर आमने सामने येणार आहेत.छोट्या पडद्यावर कोणाचा शो अव्वल ठरणार याकडेच सा-यांचे लक्ष लागल्याचे पाहायला मिळत आहे.एका मुलाखती आमिरला 'टेड टॉक्स इंडिया नयी सोच' हा शो करायला आवडणार का?असा प्रश्न विचारण्यात आला होता.त्यावेळी ''टेड टॉक्समध्ये मला फारसा रस नाही.कारण मला कोणी प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं मी सहज देऊ शकतो.मात्र टेड टॉकमध्ये तसं काही नसतं.तुम्हाला 15 ते 20 मिनिटे स्वतःहून बोलायचं असतं.मर्यादित वेळेत उगाच एकटंच बडबड करण्यात मला बिल्कुल रस नसल्याचे म्हटले होते.''

आमिरचा शो सत्यमेव जयतेचे दोन्ही सीझन्स प्रेक्षकांना आवडले. सध्या ह्या शो च्या तिसऱ्या सीझनबद्दल बातचीत होत असून शाहरूख खानचा टेड टॉक्स इंडिया नयी सोच १० डिसेंबरपासून सुरू होत आहे.एसआरकेच्या शोला तारीख आणि वेळ मिळण्याआधी ह्या दोन सुपरस्टार्सच्या शोज्‌च्या वेळांची टक्कर होईल अशी चर्चा होती. पण सध्या तरी हे टळले आहे. सूत्रांनुसार, आमिर आणि शाहरूख यांच्यात सध्या परत एकदा मैत्री झाली असून आर्थिक तसेच व्यक्तिगत कारणांमुळे शोज्‌चा हा संघर्ष टळला आहे.हे दोन्ही शोज्‌ कॉन्टेन्टमध्ये पूर्णपणे वेगळे असून त्यांच्यात तुलना करणे योग्य नाही. सूत्रांनी असेही सांगितले, सत्यमेव जयते हा शो भारतातील स्त्रीभ्रूणहत्या, बाल लैंगिक शोषण,बलात्कार, ऑनर किलिंग, कौटुंबिक मारहाण, व्यसन अशा विभिन्न समस्यांकडे लक्ष वेधतो तर टेड टॉक्समध्ये प्रत्येक भागात एक विशेष संकल्पना असेल आणि देशाला प्रेरणा देणाऱ्या नवीनकल्पनांवर हा शो लक्ष केंद्रित करेल.आमिर सध्या त्याला समाधान मिळेल अशा कुठल्यातरी गोष्टीच्या शोधात असून तोपर्यंत तो सत्यमेव जयतेचे चित्रीकरण करणार नाही. टेड टॉक्स इंडिया नयी सोच हीसुद्धा मर्यादित भागांची मालिका असून आम्ही सगळेच किंग खान पुन्हा एकदा छोट्‌या पडद्यावर येऊन आपली जादू पसरवण्याच्या प्रतीक्षेत आहोत.

Also Read:मिशन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे - आमिर खान

Web Title: Aamir Khan's 'Satyamev Jayate Season 3' will soon be hosted by fans, while Shahrukh will also entertain entertainers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.