'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट,संजनाच्या गृहप्रवेशावेळी घडणार धक्कादायक घडामोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 15:55 IST2021-08-31T15:45:18+5:302021-08-31T15:55:28+5:30
लग्नानंतर आता संजनाला समृद्ध बंगल्यातच गृहप्रवेश करायचा असल्याचे सांगते. अनिरुद्ध मात्र यासाठी तयार नसतो. संजनाला समजवण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे राहयला जाऊ असेही सांगतो. मात्र संजना तिच्या मतावर ठाम असते.

'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट,संजनाच्या गृहप्रवेशावेळी घडणार धक्कादायक घडामोडी
'आई कुठे काय करते' ही मालिका सुरु झाल्यापासूनच रसिकांची आवडती मालिका बनली होती. दिवसेंदिवस घडणाऱ्या रंजक घडामोडींमुळे मालिकेला रसिक खिळून आहेत. रसिक मालिकेचा प्रत्येक एपिसोड न चुकता पाहातात. कलाकारांचा दमदार अभिनय, मालिकेचे कथानक आणि त्यातील संवाद यांमुळे ही मालिका प्रेक्षकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार याचीच रसिकांना उत्सुकता असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच मालिकेत संजना आणि अनिरुद्धचा लग्नाचा घाट घातल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नातही ट्विस्ट येतो.
लग्नाच्या ऐनवेळेला अनिरुद्ध घरातून गायब होतो. कावरीबावरी झालेली संजना देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात येते आणि घरातल्यांना वाटेल ते बोलू लागते. त्याचवेळी डॉक्टरांकडे जायला निघालेली अरुंधती घरी परत येते आणि संजनाची बोलती बंद करते. अरुंधतीच्या सांगण्यावरून अनिरुद्ध घरी परत येतो. अनिरुध्दला पाहताच संजनाचा राग अनावर होतो आणि अनिरुद्धच्या कानशिलात मारते, त्याला जाब विचारते. त्यावेळी अनिरुद्ध लग्न करण्यास तो नकार देतो. अरुंधतीची जागा तो दुसऱ्या कोणाला देऊ शकत नसल्याचे सांगतो. इतकं ऐकूनही संजना मात्र लग्नाचा हट्ट धरुन बसते. लग्न केले नाही तर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचीही ती धमकी देते. हे सगळं ऐकून अनिरुद्धची आई कांचन घराची बदनामी होऊ नये यासाठी लग्न करण्यास अनिरुद्धला सांगते. नाइलाज म्हणून अनिरुद्धला संजनाशी लग्न करावे लागते.
लग्नानंतर आता संजनाला समृद्ध बंगल्यातच गृहप्रवेश करायचा असल्याचे सांगते.अनिरुद्ध मात्र यासाठी तयार नसतो. संजनाला समजवण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे राहयला जाऊ असेही सांगतो. मात्र संजना तिच्या मतावर ठाम असते.संजनाचा गृहप्रवेश पाहून अनिरुद्धची आई कांचनलाही राग येतो. तिला मोठा धक्काच बसतो ती जमीनीवर कोसळते. आईची या लग्नामुळे झालेली अवस्था पाहून अनिरुद्धही आईला सावरण्याच प्रयत्न करतो. इतकं सगळं घडून सुद्धा संजना समृद्ध बंगल्यात माप ओलांडून गृहप्रवेश करते. आता अनिरुद्ध आणि संजनाच्या लग्नानंतर घरात आणखी काय काय घडामोडी घडणार हे पाहण्यासाठी रसिकही उत्सुक असतील हे मात्र नक्की.