आन्या लगीन... ढींच्याक ढीचाक़..! ‘आई कुठे काय करते’वरचे हे मीम्स पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 02:35 PM2021-08-20T14:35:28+5:302021-08-20T14:36:45+5:30

Aai Kuthe Kay Karte Serial : होय, ‘आई कुठे काय करते’वरचे एकापेक्षा एक भारी मीम्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

Aai Kuthe Kay Karte Serial amazing memes on social media |  आन्या लगीन... ढींच्याक ढीचाक़..! ‘आई कुठे काय करते’वरचे हे मीम्स पाहून पोट धरून हसाल

 आन्या लगीन... ढींच्याक ढीचाक़..! ‘आई कुठे काय करते’वरचे हे मीम्स पाहून पोट धरून हसाल

googlenewsNext
ठळक मुद्देस्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte ) सध्या चांगलीच चर्चेत आहेत. मालिका एका रंजक वळणावर आलीये. यामुळे मालिकेची चर्चा आहेच. पण त्यापेक्षा जास्त चर्चा होतेय ती या मालिकेवरच्या व्हायरल मीम्सची. होय, ‘आई कुठे काय करते’वरचे एकापेक्षा एक भारी मीम्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. 

 मालिकेत आता  अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाच्या दिवशीच  25 वर्षाचा संसार मागे सोडून अरुंधती  तिच्या नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. अशात अचानक पोटातील गाठ वाढत असल्याने तिचं ऑपरेशन झालं आहे आणि अरुंधतीला आरामासाठी पुन्हा समृद्धी बंगल्यात आणावं या निर्णयावर देशमुख कुटुंबातील सर्वांचेच एकमत झालं आहे.

दुसरीकडे अरुंधतीला पुन्हा समृद्धी बंगल्यात आणणार हे ऐकून संजना प्रचंड संतापली आहे. लग्नासाठी ती अनिरुद्धच्या मागे लागली आहे. 

एकीकडे मालिका गाजत असताना दुसरीकडे या मालिकेवरचे मीम्सही गाजत आहेत. मालिकेतील अनेक प्रसंगावरचे, सीन्सवरचे मीम्स व्हायरल होत आहेत. लग्नासाठी उतावीळ झालेल्या संजनावरचे मीम्स तर इतके मजेदार आहेत की ते पाहून हसू आवरणार नाही.

या मालिकेत अरूंधतीच्या भूमिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर पहायला मिळते आहे. मधुराणी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर अरूंधतीशी निगडीत एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. संजनाची निगेटीव्ह भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले हिने साकारली आहे.

आता मालिकेत अरुंधतीचा लूक बदलणार असल्याची चर्चा होत आहे. मालिकेत एकीकडे अनिरुद्ध-अरुंधतीचा घटस्फोट दाखवला जात आहे, तर दुसरीकडे ‘अरुंधती’ साकारणाऱ्या मधुराणी प्रभुलकर हिने सोशल मीडियावर नवा लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये मधुराणी अतिशय शॉर्ट केसांसह नव्या लूकमध्ये दिसत आहे. 

Web Title: Aai Kuthe Kay Karte Serial amazing memes on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.