Aai Kuthe Kay Karte : संजनासाठी अनिरूद्ध झाला कान्हा, व्हिडीओ पाहून क्रेझी झालेत फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 17:21 IST2022-02-02T17:20:12+5:302022-02-02T17:21:29+5:30
Aai Kuthe Kay Karte : अनिरूद्ध अर्थात ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सध्या या व्हिडीओचीच चर्चा आहे.

Aai Kuthe Kay Karte : संजनासाठी अनिरूद्ध झाला कान्हा, व्हिडीओ पाहून क्रेझी झालेत फॅन्स
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. सोशल मीडियावर सतत या मालिकेची चर्चा होताना दिसते. अनिरूद्ध, अरूंधती, संजना या मालिकेतील व्यक्तिरेखा म्हणजे प्रेक्षकांच्या आवडत्या व्यक्तिरेखा. या भूमिका साकारणारे कलाकारही प्रेक्षकांचे लाडके. अशात चर्चा तर होणारच. तूर्तास या मालिकेतील अनिरूद्ध अर्थात ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सध्या या व्हिडीओचीच चर्चा आहे.
‘गेल्या 500 एपिसोडमध्ये आम्ही अनेकदा नाचताना दिसलो. संतोष भांगरे यांनी आम्हाला नाच शिकवला. आमच्याकडे चांगले नर्तक आहेत. अर्थात माझ्यासारखे फक्त पाय हलवू शकतात. पण बिचाऱ्या माझ्या सहकलाकारांजवळ मला सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही,’अशा कॅप्शनसह मिलिंद गवळी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत अनिरूद्ध संजनासोबत थिरकताना दिसत आहे. मालिकेत अनिरूद्ध नेहमीच संजनाच्या तालावर नाचतो. आता प्रत्यक्षातही संजनासोबत त्याला नाचताना पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. या डान्सची प्रॅक्टीस करताना अनिरुद्ध संजनासाठी कान्हा झाल्याचे दिसत आहे. आता तो कान्हा का झाला? ही कशाची तयारी आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अद्याप तरी त्याचा उलगडा झालेला नाही. कदाचित देशमुख कुटुंबातील एखाद्या कार्यक्रमाची ही तयारी असू शकते. मालिकेच्या येणाऱ्या भागांत ते कळेलंच.
आई कुठे काय करते या मालिकेचे कथानक अरुंधतीभोवती फिरताना दिसते. आता अरुंधतीचे आयुष्य एका वेगळ्या वळणावर आहे. हे वळण तिच्या आयुष्याला दिशा देणारे आहे. तिच्या आवाजातील पहिल्या गाण्याचे रेकॉर्डिंग झालं आहे. अशात नेहमी तिचा तिरस्कार करणारा अनिरुद्ध तिच्याशी कसा वागणार हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.