'आई कुठे काय करते'मधील शेखरच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूप सुंदर, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 17:29 IST2022-04-26T17:29:21+5:302022-04-26T17:29:44+5:30
Aai Kuthe Kay Karte:'आई कुठे काय करते' मालिकेत शेखरची भूमिका अभिनेता मयुर खांडगे(Mayur Khandge)ने साकारली आहे.

'आई कुठे काय करते'मधील शेखरच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूप सुंदर, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, आप्पा, कांचन आई, यश, अभिषेक, अनघा, ईशा आणि संंजना या पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. याशिवाय आशुतोष, नितीन आणि संजनाचा आधीचा नवरा शेखर या पात्रांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. शेखरची भूमिका अभिनेता मयुर खांडगे(Mayur Khandge)ने साकारली आहे. नुकताच तो चर्चेत आला आहे. त्याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेता मयुर खांडगे सोशल मीडियावर सक्रिय असून तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान नुकतेच त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर पत्नीसोबतचा फोटो शेअर करत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने पत्नीसोबत फोटो शेअर करत लिहिले की, लग्नाच्या दहाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको. लव्ह यू. या पोस्टवर काही सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनेता मयुर खांडगेने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर काम केले आहे. देऊळ, हायवे एक सेल्फी आरपार आणि सायकल या चित्रपटात त्याने काम केले आहे. आई कुठे काय करते शिवाय त्याने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. मात्र आई कुठे काय करते मालिकेतील शेखर या भूमिकेतून त्याला खूप लोकप्रियता मिळाली आहे.