Aai Kuthe Kay Karte : अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरच्या नवऱ्याचा आणि लेकीचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 13:02 IST2022-01-24T13:02:32+5:302022-01-24T13:02:53+5:30
Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात.

Aai Kuthe Kay Karte : अरुंधती उर्फ मधुराणी प्रभुलकरच्या नवऱ्याचा आणि लेकीचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar)ला या मालिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे. या मालिकेत तिने साकारलेली अरूंधती सर्वांची लाडकी झाली आहे. त्यामुळे अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. दरम्यान आता तिच्या नवऱ्याचा आणि लेकीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मधुराणी प्रभुलकर हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मधुराणीची लेक आणि नवरा प्रमोद मेरा यार या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, फादर डॉटर मोमेंट. झाली तालावर नाचायला सुरूवात. मधुराणीच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळते आहे आणि या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
दरम्यान, मधुराणी बऱ्याच वेळा सोशल मीडियावर लेक स्वरालीचे व्हिडीओ शेअर करत असते. स्वराली हे नाव ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ठेवल्याचे मधुराणी प्रभुलकरने एका मुलाखतीत सांगितले होते. 'सुंदर माझं घर' या चित्रपटात मधुराणीने महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच तिने संगीत दिग्दर्शनही केले होते. विशेष बाब म्हणजे या चित्रपटातील गाणी दिलीप प्रभावळकर यांना विशेष आवडली त्यामुळे ते सेटवर मधुराणीला स्वराली संबोधायचे. तसेच त्यांनी तुम्हाला मुलगी झाल्यावर तिचे नाव स्वराली ठेवा असेही मधुराणीला सांगितले होते.