Aai kuthe kay kart : अरुंधतीला लागली लॉटरी, मिळाला नवीन प्रोजेक्ट; नवा लूक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 16:18 IST2022-03-24T16:13:17+5:302022-03-24T16:18:42+5:30
आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीच्या पात्राने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

Aai kuthe kay kart : अरुंधतीला लागली लॉटरी, मिळाला नवीन प्रोजेक्ट; नवा लूक आला समोर
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील आई म्हणजेच अरुंधतीच्या पात्राने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मधुराणीने अलीकडेच एक BTS व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरून तिला नवा प्रोजेक्ट मिळाल्याचे कळतंय.
मधुराणी लवकरच एका नव्या जाहिरातीत झळकणार आहे. पडद्यामागचा व्हिडिओ शेअर करत तिनं याबद्दल माहिती शेअर केली आहे. यामध्ये ती लाल रंगाच्या साडीत सिंपल लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना देखील तिचा हा नवीन लुक आवडला आहे व तिला नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे. मात्र ही जाहिरात कशाची आहे याबद्दल तिनं कोणतीच माहिती दिलेली नाही. चाहते मात्र तिच्यासाठी आनंदी आहेत.
दरम्यान, मधुराणी गोखले ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून जाहिरात क्षेत्रापासून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू तिचा प्रवास मोठ्या पडद्याकडे झाला. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.