'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत नवा ट्विस्ट, लावणी सम्राज्ञी माया जाधव यांची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 01:07 PM2024-01-11T13:07:58+5:302024-01-11T13:08:34+5:30

Tuzech Mi Geet Gaat Aahe :'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत साहेबराव आणि मंजुळाच्या नात्याचं रहस्य दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. अशातच मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे.

A new twist in the series 'Tujhech Mi Geet Gaat Aahe', Lavani empress Maya Jadhav's entry | 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत नवा ट्विस्ट, लावणी सम्राज्ञी माया जाधव यांची एन्ट्री

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत नवा ट्विस्ट, लावणी सम्राज्ञी माया जाधव यांची एन्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेत अभिजीत खांडकेकर, उर्मिला कोठारे, तेजस्विनी लोणारी आणि अन्य कलाकार यांनी उत्तमरित्या त्यांच्या भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेत साहेबराव आणि मंजुळाच्या नात्याचं रहस्य दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. अश्यातच मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. दाईमा या नव्या पात्राची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. ही व्यक्तीरेखा सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया जाधव दाईमा साकारणार आहेत. 

तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील दाईमाचं मंजुळासोबत खास नातं आहे. दाईमाच्या एण्ट्रीने अनेक नात्यांविषयीचा खुलासा होणार आहे. त्यामुळे तुझेच मी गीत गात आहे मालिकेचे पुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असतील यात शंका नाही. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांना आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये पाहिलं आहे. लवकरच माया जाधव यांना देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. माया जाधव यांनी अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. 


दाईमा आणि मंजुळाचं नेमकं नातं काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुझेच मी गीत गात आहे मालिकेचे यापुढील भाग पाहायला लागेल.

Web Title: A new twist in the series 'Tujhech Mi Geet Gaat Aahe', Lavani empress Maya Jadhav's entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.