१२ वर्षांनंतर ‘या’ चित्रपटात सलमान खानसोबत दिसणार विभुती नारायण मिश्रा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 16:48 IST2018-05-29T09:36:18+5:302018-05-29T16:48:41+5:30
‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला विभुती नारायण मिश्रा अर्थात अभिनेता आशिफ शेख लवकरच सुपरस्टार सलमान ...

१२ वर्षांनंतर ‘या’ चित्रपटात सलमान खानसोबत दिसणार विभुती नारायण मिश्रा!
‘ ाभी जी घर पर हैं’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला विभुती नारायण मिश्रा अर्थात अभिनेता आशिफ शेख लवकरच सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत आगामी ‘भारत’मध्ये बघावयास मिळणार आहे. चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर पेजवर लिहिण्यात आले की, ‘भाभी जी घर पर हैं’चा प्रसिद्ध अभिनेता आशिफ शेख बारा वर्षांनंतर सलमान खानसोबत झळकणार आहे. अली अब्बास जफरच्या आगामी ‘भारत’मध्ये त्याची एंट्री झाली आहे.
या अगोदर आशिफ आणि सलमान खान ‘करण अर्जुन, बंधन, प्यार किया तो डरना क्या आणि दिल ने जिसे अपना कहा’ या चित्रपटात एकत्र बघावयास मिळाले आहेत. दोघे या अगोदर २००६ मध्ये ‘शादी करके फंस गया’मध्ये बघावयास मिळाले होते. आता बारा वर्षांनंतर हे दोघे एकत्र येणार आहेत.
![]()
दरम्यान, ‘भारत’मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा, तब्बू, दिशा पटानी आणि सुनील ग्रोवर यांसारख्या प्रमुख अभिनेत्यांची वर्णी लागली आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर हे पुन्हा एकदा सलमानला घेऊन ‘भारत’ची निर्मिती करीत आहेत. सलमानसोबतचा हा त्यांचा तिसरा चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी ‘सुलतान’ आणि ‘टायगर जिंदा हैं’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये सलमानसोबत काम केले. ‘भारत’ २०१९ मध्ये ईदनिमित्त प्रदर्शित होणार आहे.