टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरनं 'क्योंकि सास भी कभी बहू थी' संदर्भात दिली मोठी हिंट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 20:05 IST2025-05-12T20:04:48+5:302025-05-12T20:05:16+5:30

Ekta Kapoor : एकता कपूरने 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेच्या आठवणींना उजाळा देताना एक संकेत दिला, ज्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत.

Television Queen Ekta Kapoor gave a big hint regarding 'Kyonki Saas Bhi Kabhi Bahu Thi', said... | टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरनं 'क्योंकि सास भी कभी बहू थी' संदर्भात दिली मोठी हिंट, म्हणाली...

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरनं 'क्योंकि सास भी कभी बहू थी' संदर्भात दिली मोठी हिंट, म्हणाली...

एकता कपूर(Ekta Kapoor)ने आपल्या कंटेंटद्वारे सिनेइंडस्ट्रीत अनेक मोठे बदल घडवून आणले आहेत. टेलिव्हिजनपासून सिनेमा आणि ओटीटीपर्यंत ती प्रत्येक माध्यमावर आपली मजबूत पकड ठेवून आहे आणि प्रेक्षकांना नेहमी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असते. तिने अनेक अविस्मरणीय शोज दिले आहेत, पण तिचा सर्वात लोकप्रिय शो 'क्योंकि सास भी कभी बहू थी' आजही भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील एक लिजेंडरी शो मानला जातो. इतक्या दशकांनंतरही प्रेक्षक या आयकॉनिक शोशी आजही भावनिकदृष्ट्या जोडलेले आहेत.

अलीकडेच एकता कपूरने 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेच्या आठवणींना उजाळा देताना एक संकेत दिला, ज्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत. एकता कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती वेगवेगळ्या मूड्समध्ये दिसत आहेत. बॅकग्राउंडला क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेची आयकॉनिक ट्यून वाजत होती, ज्यातून तिने एक मोठी हिंट दिलीय आणि चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय.


याशिवाय, एकता कपूरला ५१व्या इंटरनॅशनल एम्मी अवॉर्ड्समध्ये इंटरनॅशनल एम्मी डायरेक्टोरेट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच, भारत सरकारने तिला कला क्षेत्रातील योगदानासाठी देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री प्रदान केला आहे. याव्यतिरिक्त, एकता कपूरने नुकतेच मुंबईत पार पडलेल्या WAVES समिट २०२५ मध्ये मध्य प्रदेश फिल्म टुरिझ्म पॉलिसी २०२५चे उद्घाटन केले. या समिटमध्ये त्यांनी मध्य प्रदेशच्या फिल्म इंडस्ट्रीतील अफाट शक्यता याबद्दल कौतुक केले आणि तेथील सुंदर लोकेशन्स व सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन देण्याबाबत आपली भूमिका मांडली. तिने हेही अधोरेखित केले की, राज्याला एक फिल्म हब बनवण्यासाठी आर्थिक सहकार्य आवश्यक आहे.
 

Web Title: Television Queen Ekta Kapoor gave a big hint regarding 'Kyonki Saas Bhi Kabhi Bahu Thi', said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.