'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 10:24 IST2025-08-12T10:23:44+5:302025-08-12T10:24:05+5:30
मालिकेचा पहिलाच एपिसोड प्रेक्षकांना कसा वाटला जाणून घेऊया

'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
सुबोध भावे (Subodh Bhave) आणि तेजश्री प्रधानची (Tejashri Pradhan) नवी मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' (Vin Doghantali hi tutena) सुरु झाली आहे. कालच याचा पहिला एपिसोड प्रसारित झाला. या मालिकेतून तेजश्री प्रधान बऱ्याच काळानंतर झी मराठीवर आली आहे. याच वाहिनीवरची तिची 'होणार सून मी या घरची' मालिका प्रचंड गाजली होती. जान्हवी या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. आता स्वानंदी भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेचा पहिलाच एपिसोड प्रेक्षकांना कसा वाटला जाणून घेऊया
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेचा पहिला एपिसोड सर्वांनी पाहिला. तेजश्री प्रधान 'स्वानंदी' आणि सुबोध भावे 'समर'च्या भूमिकेतून समोर आले. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेची चर्चा होती. अनेक प्रोमोही आले होते. 'होणार सून मी या घरची' मालिकेत जान्हवीचे जसे बसस्टॉपवरचे सीन्स गाजले होते त्याच बसस्टॉपवर तेजश्री परत आली. तिलाही जुने दिवस आठवले. तर आता 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या पहिल्या एपिसोडलाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या एपिसोडमध्ये प्रत्येक पात्राची ओळख करुन देण्यात आली. सुबोध भावेचा 'समर' तुला पाहते रे मालिकेची आठवण करुन देणाराच वाटला.
मालिकेचा पहिला एपिसोड पाहून प्रेक्षकांनी कमेंट करत लिहिले, 'पुढच्या एपिसोडची आतुरतेने वाट पाहत आहे','पहिला एपिसोड मस्त दणक्यात पार पडला. गोष्टीचा पाया प्रेमाने घातला आणि पात्रांची एकामागोमाग उलगड केली. त्यामुळे पहिला भाग खूप आवडला. आता रोजल पाहीन','तेजश्री आहे म्हटल्यावर ते छानच होणार त्यात सुबोध भावे जोडीला म्हटल्यावर मालिका नंबर १ होणार ही खात्री आहे' अशा विविध कमेंट्स सोशल मीडियावर आल्या आहेत.
१२ ऑगस्टपासून 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका झी मराठीवर सुरु झाली आहे. संध्याकाळी ७.३० वाजता प्राईम टाईमला मालिकेचं प्रसारण केलं जात आहे.