कशा असतात ह्या बायका! तेजश्री प्रधान पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 03:47 PM2021-10-24T15:47:09+5:302021-10-24T15:48:32+5:30

Kasha Astat Hya Bayka : प्रेक्षकांसाठी दिवाळीची खास भेट; तेजश्री प्रधान आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच एकत्र

tejashree pradhan abhijeet khandakekar special shortfilm kasha astat hya bayka | कशा असतात ह्या बायका! तेजश्री प्रधान पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत

कशा असतात ह्या बायका! तेजश्री प्रधान पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्देअत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने दिलेला एक महत्त्वाचा संदेश आणि तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी हे सगळं म्हणजे एक फक्कड मेजवानी आहे.  

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील शुभ्रा अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आलीये. होय,‘कशा असतात ह्या बायका’ (Kasha Astat Hya Bayka ) या मराठी लघुपटात तेजश्री एका आगळ्यावेगळ्या रूपात दिसतेय.
भावा-बहिणीच्या नात्याला अधोरेखित करणा-या ‘कशा असतात ह्या बायका’ या लघुपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान, अभिनेता अभिजीत खांडकेकर यांची जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. कोटा फॅक्टरी फेम अभिनेता मयुर मोरे सुद्धा या  लघुपटाद्वारे मराठीत पदार्पण करत आहे.  घर, कुटुंब आणि करिअर सांभाळणा-या सर्व महिलांना समर्पित असा हा लघुपत सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

तेजश्रीने इन्स्टावर या लघुपटाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. ‘भावा बहिणीच्या नात्यातले, नाजूक पदर उलगडणारी, एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या पाठीशी समर्थपणे उभी राहणारी ही नव्या जमान्यातील भावा बहिणीची जोडी... आपल्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीची सर्व पातळ्यांवर लढण्याचीआणि नाती जपण्याची सक्षमता दाखविणारी एक छोटीशी गोष्ट,’अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.
 अत्यंत तरल, हलकाफुलका आणि हळव्या पद्धतीने दिलेला एक महत्त्वाचा संदेश आणि तेजश्री, अभिजीत आणि मयूरची जुगलबंदी हे सगळं  म्हणजे एक फक्कड मेजवानी आहे.  
‘कॉटनकिंग’ची प्रस्तूती असलेला हा लघुपट फेसबुक, युट्यूब व इन्स्टाग्रामवर उपलब्ध आहे. लघुपटाचे प्रस्तुतकर्ता कॉटन किंगचे संचालक कौशिक मराठे याबद्दल सांगतात, ‘आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या स्त्रिया या विविध पातळीवर विविध भूमिका सक्षमपणे बजावत असताना त्यांची तारांबळ उडते आणि तरीही घरातील पुरुष मात्र त्यांना गृहीत धरत असतात. हा लघुपट निव्वळ एक कलाकृती नसून प्रत्येक महिलेच्या कर्तृत्वाला मानवंदना देणारी कलाकृती आहे.’  

Web Title: tejashree pradhan abhijeet khandakekar special shortfilm kasha astat hya bayka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.