समाजातील विषमतेवर भाष्य करणारा ‘‘ताटवा’’

By Admin | Updated: May 24, 2017 00:34 IST2017-05-24T00:34:12+5:302017-05-24T00:34:12+5:30

ताटवा सिनेमाच्या टीमने नुकतीच लोकमत आॅफिसला भेट दिली. समाजातील विषमतेवर भाष्य करणारा ताटवा हा चित्रपट आहे.

'Tatwa' commenting on the inequality of society | समाजातील विषमतेवर भाष्य करणारा ‘‘ताटवा’’

समाजातील विषमतेवर भाष्य करणारा ‘‘ताटवा’’

ताटवा सिनेमाच्या टीमने नुकतीच लोकमत आॅफिसला भेट दिली. समाजातील विषमतेवर भाष्य करणारा ताटवा हा चित्रपट आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वैविध्यपूर्ण विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. विषयासोबतच चित्रपटांच्या आशयामध्येही विविधता दिसून येत आहे. समाजात आजही जात, रूढी, परंपरा यांची मुळं खोलवर रुजलेली दिसतात. एकीकडे ‘जात’ या संकल्पनेचे समूळ उच्चाटन करण्याचे भाष्य करीत असताना जातीपातीचे राजकारण खेळणारी सुशिक्षित माणसे सभोवताली वावरताना दिसतात. याच विचारधारेवर प्रकाश टाकणारा ‘ताटवा’ हा नवा मराठी चित्रपट येत्या २६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शरयू आर्ट प्रोडक्शन’निर्मित ‘ताटवा’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. शरयू पाझारे यांनी केली असून दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केले आहे. प्रेम आणि कला या दोन गोष्टी अशा आहेत, की ज्यांना जातीचे बंधन कधीच अडवू शकत नाही. प्रेमाची आणि कलेची सांगड घालत ‘ताटवा’ या सिनेमाची कथा गुंफली आहे. या चित्रपटाची कथा शिल्पा या पाथरवट समाजातील मुलीच्या जीवनावर बेतलेली आहे. दगडाचे पाटे, वरवंटे, खेळणी विकून शिल्पाचे कुटुंब उदरर्निवाह करत असते. एका अनपेक्षित क्षणी लिखितचा तिच्या आयुष्यात प्रवेश होतो आणि त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी कोणत्या वळणावर येऊन थांबते? जातिवादाचे चटके सोसून शिल्पा येणाऱ्या समस्यांवर कशी मात करते? हे पाहण्यासाठी २६ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे. संजय शेजवळ आणि गौरी कोंगे ही नवी जोडी ‘ताटवा’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोबत अरुण नलावडे, डॉ. शरयू पाझारे, देवेंद्र दोडके, डॉ. सरिता घरडे, विक्रांत बोरकर, नूतन धवणे, शीतल राऊत, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजूषा जोशी आणि बालकलाकार गौरी यांच्या भूमिका आहेत. श्रीपाद भोळेलिखित या चित्रपटातील गीतांना संगीतकार अतुल जोशी, प्रशांत फासगे यांनी संगीत दिले असून गायक केवल वाळंज, सावनी रवींद्र, योगिता गोडबोले, अतुल जोशी, प्रसाद शुक्ल यांनी ही गाणी गायली आहेत.

Web Title: 'Tatwa' commenting on the inequality of society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.