विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:53 IST2025-08-04T10:52:53+5:302025-08-04T10:53:09+5:30
विराटसोबत होतं तमन्नाचं अफेअर?

विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
Tamannaah Bhatia And Virat Kohli Dating Rumors: दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) केवळ तिच्या अभिनयामुळेच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. विशेषतः तिचे प्रेमसंबंध हे चाहत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरले आहेत. तमन्ना गेल्या दोन वर्षांपासून अभिनेता विजय वर्मा याला डेट करत होती. पण, अलिकडेच दोघांचं ब्रेकअप झालं. विजय आधीही तमन्नाचे नाव क्रिकेटपटू विराट कोहली आणि पाकिस्तानी खेळाडू अब्दुल रज्जाकसोबतही जोडलं गेलं आहे. आता अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडेच तमन्नाने 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. यावेळी तिनं अनेक मुद्यावर भाष्य केलं. याच मुलाखतीत तमन्ना भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसोबतच्या तिच्या अफेअरच्या अफवांबद्दल पहिल्यांदाचं बोलली. तमन्ना म्हणाली, "मला याविषयी फार वाईट वाटतं. कारण मी त्याला फक्त एकदाच शूटिंगनिमित्त भेटली होती. शूटिंगनंतर आम्ही पुन्हा कधी भेटलोसुद्धा नव्हतो. आमचं फार कधी बोलणंही झालं नव्हतं. मी विराटला नंतर कधीच भेटली नाही. जर याबद्दल त्याला माहिती असेल तर तोही या अफवांवर हसत असेल".
दरम्यान, तमन्ना आणि विराट यांनी एका जाहिरातीत एकत्र काम केलं होतं. सेटवरील दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता.यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मीडिया रिपोर्टनुसार,दोघांनीही काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. काही काळानंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. याशिवाय तमन्नाचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रजाकसोबतही जोडलं गेलं होतं. ते एका ज्वेलरी शॉपमध्ये एकत्र दिसले होते, तेव्हापासून त्यांच्या अफेयरची चर्चा सुरु झाली होती. हे २०१७ मध्ये घडलं होतं. दोघे लग्न करणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
या बातम्यांची खिल्ली उडवत तमन्ना म्हणाली, "मस्करी मस्करीत माझं अब्दुल रझाकसोबतही लग्न झालंय. इंटरनेट हे एक मजेशीर ठिकाण आहे. इंटरनेटनं दिलेल्या माहितीनुसार, माझं लग्न काही काळासाठी अब्दुल रझाकशी झालं होतंयानंतर तमन्नाने कॅमेऱ्याकडे पाहत हात जोडून म्हटलं, माफ करा अब्दुल रझाक सर. तुम्हाला दोन-तीन मुलं आहेत, मला माहीत नाही, तुमचं आयुष्य काय आहे. ते खरंच खूप लाजिरवाणं होतं. मी एका ज्वेलरी शॉपच्या उद्घाटन समारंभांसाठी गेलेली, तिथे पाकिस्तानी क्रिकेटपटुही उपस्थित होते".
पुढे तमन्नानं म्हटलं, "अशा अफवांना सामोरे जाणे कठीण आहे. हे खूप विचित्र आहे. कारण जेव्हा तुमचा त्या व्यक्तीशी काहीही संबंध नसतो आणि तरीही लोक अफवा पसरवतात तेव्हा ते खूप विचित्र असते. पण तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही काहीही करू शकत नाही हे गोष्टसुद्धा स्वीकारण्यास वेळ लागतो. लोक त्यांना काय हवे ते विचारत राहतील. तुम्ही बसून कोणावरही नियंत्रण ठेवू शकत नाही
अशा अफवांना तोंड देणे कठीण असते".