बड्या-बड्या बाता करणाऱ्या स्वामी ओमला चोरट्यांनी लुटले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 22:08 IST2017-03-31T16:15:25+5:302017-03-31T22:08:54+5:30
वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये झटपट प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात धक्कादायक कारनामे करणाºया स्वयंघोषित बाबा स्वामी ओमने रातोरात प्रसिद्धी मिळवली ...

बड्या-बड्या बाता करणाऱ्या स्वामी ओमला चोरट्यांनी लुटले!
व दग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये झटपट प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात धक्कादायक कारनामे करणाºया स्वयंघोषित बाबा स्वामी ओमने रातोरात प्रसिद्धी मिळवली खरी, परंतु ही प्रसिद्धी नसून कुप्रसिद्धी असल्याने ते आजही दरदिवसाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चर्चेत राहत आहेत. अर्थात ही चर्चा वादग्रस्तच असते. आता तर त्यांच्याबाबतीत भलतीच माहिती समोर आली आहे. मी ईश्वराचा अवतार असल्याचा दावा करणाºया स्वामी ओमला चक्क दोन चोरट्यांनी लुटले आहे.
खरं तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बिग बॉसच्या घरात गेलेल्या स्वामी ओमच्या मागे शुक्लकाष्टच लागले आहे. कारण घरातून बाहेर पडल्यापासून अनेक घटना त्यांच्यासोबत घडत आहेत. कधी टीव्ही चॅनलमध्ये त्यांना चोप पडत आहे तर कधी रेल्वे स्टेशनवर भिकाºयांसारखे कपडे बदलण्याची वेळ त्यांच्यावर उद्भवत आहे. अर्थात यास स्वामी ओम हे स्वत:च जबाबदार आहेत, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.
आता नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेवरून तर ते करीत असलेले सर्वच दावे पूर्णत: फोल ठरले आहे. स्वामी ओमने पानिपत येथील सेक्टर सहा-सात पोलीस चौकीत एक तक्रार नोंदविली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार दोन चोरट्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे असलेले तीस हजार रुपये लंपास केले आहेत. यावेळी त्या चोरट्यांनी स्वामी ओमला दमही दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. स्वामी ओमने तक्रार नोंदविताच वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, स्वामी ओम संशयित आरोपींच्या मित्राच्या घरी मुक्कामाला होते. दोन तरुण चोरटे स्वामी ओमसोबत सेल्फी घेण्यासाठी पोहोचले; परंतु गेटला लॉक लावलेले असल्याने या चोरट्यांनी गेटची तोडफोड करीत स्वामी ओमला गाठले; मात्र या चोरट्यांचे एकूणच हावभाव पाहता स्वामी ओम बिथरून गेले होते. याचाच फायदा घेत त्यांनी स्वामी ओमला धमकावत त्यांच्याकडील ३० हजार रुपयांची रोकड लंपास केली. आता स्वामी ओमच्या या तक्रारीत कितपत तथ्यता आहे, हे सांगणे मुश्कील असले तरी, हाही त्यांचा प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट असावा अशी कुजबूज केली जात आहे.