जी करदा फेम गायक लभ जंजूआ यांचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: October 22, 2015 16:08 IST2015-10-22T16:07:44+5:302015-10-22T16:08:11+5:30
जी करदा, लंडन ठुमकदा अशा सुपरहिट गाण्यांचे गायक लभ जंजूआ यांचा गुरुवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला.

जी करदा फेम गायक लभ जंजूआ यांचा संशयास्पद मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - जी करदा, लंडन ठुमकदा अशा सुपरहिट गाण्यांचे गायक लभ जंजूआ यांचा गुरुवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला. मुंबईतील गोरेगावमधील राहत्या घरी जंजूआ मृतावस्थेत आढळले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मुंडियो तो बच के या पंजाबी भांगडा गाण्यामुळे लोकप्रिय झालेले लभ जंजूआ यांनी २००७ बॉलीवूडमध्ये ढोल या चित्रपटातून पदार्पण केले. ढोलमधील ढोल बजाके या शीर्षक गीतामुळे लभ जंजूआ हिंदी संगीत क्षेत्रात प्रसिद्ध झाले आणि यानंतर त्यांनी लागोपाठ हिट गाणी दिली. देव डीमधील माही मेनू, रब ने बना दी जोडीमधील डान्स पे चान्स अशी एका पेक्षा एक हिट गाणी त्यांनी दिली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिंग इज ब्लिंगमधील दिल करे चू चे हे गाणेही त्यांनी गायले होते.