सुशांतचा ‘पानी’ अधांतरी
By Admin | Updated: December 22, 2014 00:03 IST2014-12-22T00:03:46+5:302014-12-22T00:03:46+5:30
यशराज बॅनरअंतर्गत तयार होणा-या या चित्रपटासाठी सुशांतसिंह राजपूत याची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती.

सुशांतचा ‘पानी’ अधांतरी
शेखर कपूरचा बहुप्रतीक्षित ‘पानी’ हा चित्रपट डब्यात गेला आहे. यशराज बॅनरअंतर्गत तयार होणा-या या चित्रपटासाठी सुशांतसिंह राजपूत याची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. वारेमाप खर्च हा चित्रपट डब्यात जाण्याचे कारण असल्याचे बोलले जाते. चित्रपटाचे बजेट कैकपटीने वाढले आहे. बजेटमध्ये कपात करण्याचे प्रयत्न प्रॉडक्शन हाऊस करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर ‘पानी’ची गाडी रुळावर येईल, असे सांगितले जाते. चित्रपट रखडल्याने सुशांतने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित चित्रपट साईन केला आहे.