प्रेक्षकांना भावतात सुपरहीरो
By Admin | Updated: February 18, 2016 07:49 IST2016-02-18T07:49:58+5:302016-02-18T07:49:58+5:30
कॉमिक पुस्तकावर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. याच क्रमातला डेडपूल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स आॅफीसवर धमाल करतो आहे

प्रेक्षकांना भावतात सुपरहीरो
कॉमिक पुस्तकावर आधारित अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. याच क्रमातला डेडपूल हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स आॅफीसवर धमाल करतो आहे. फॉक्स, सोनी, वॉर्नर ब्रदर्स, डिस्ने, मार्व्हेल स्टुडिओजचा असे चित्रपट तयार करण्यात हातखंडा आहे. कॉमिक चित्रपटांचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा आहे. २०१६ साली अशा प्रकारचे किमात सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अशा कथानकांवर येत्या २०२० पर्यंत सुमारे ६३ चित्रपट येतील, अशी अपेक्षा आहे.डेडपूल
सध्या हा चित्रपट उत्तर अमेरिकेत धमाल करतो आहे. मार्वल कॉमिक्सच्या एक्स मेनमधील एक पात्र आहे डेडपूल. विशेष म्हणजे हा हीरो नाही, व्हिलन आहे. हा अत्यंत वेगाने तलवार चालवितो, त्याची कोणतीही जखम क्षणात दुरुस्त होते, असे हे पात्र आहे. डेडपूल हा आजच्या युवा वर्गाचा हीरो आहे. याचे डायलॉग्ज प्रसिद्ध आहेत. भारतात या चित्रपटाला बरीचशी कात्री लावण्यात आली आहे.
बॅटमन वि. सुपरमॅन : डॉन आॅफ जस्टीस
या चित्रपटाच्या नावावरूनच सारे काही लक्षात येईल. या चित्रपटात बॅटमन (बेन अफ्लेक) हा सुपरमॅन (हेन्री कॅव्हील) याच्याशी लढताना दिसेल. आता अशा सिक्वेल चित्रपटाची यादी मोठी आहे. यामध्ये व्हिलनही जोरदार असतो. जेसी एलिनबर्गचा लेक ल्युथर हा अॅक्वामन (जेसन मोमोवा), वंडर वुमन (गल गॅडट) आणि सायबोर्ग (रे फिशर) यांच्यासोबत दिसेल. झॅक सिंडर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
कॅप्टन अमेरिका : सिव्हिल वॉर
या चित्रपटात टोनी स्टॉर्क हा सुपरहीरोची भूमिका वठवताना दिसून येईल. सरकारच्या प्रश्नावरचे हे युद्ध आहे. कॅप आणि स्टार्क यांच्यात जोरदार लढाई होणार आहे. रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर आणि ख्रिस इव्हान्स या चित्रपटात काम करणार आहेत. यामध्ये ब्लॅक पँथर (चाडविन बोसमन) असणार आहे. २९ एप्रिल रोजी इंग्लंडमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.
एक्स मेन : अॅपोकॅलप्स
जुन्या एक्स मेनची आठवण करुन देणारा किंबहुना त्याच्याही पुढे जाणारा हा चित्रपट आहे. यामध्ये झेव्हिअर हा अॅपोकॅलप्सशी लढताना दिसेल. हा चित्रपट भव्य आणि दिव्य असणार आहे. एप्रिल २०१५ पासून या चित्रपटाची शूटिंग सुरू झाले. ह्युज जॅकमनचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. बरेचसे कलाकार हे एक्स मेन मधीलच असतील अशी अपेक्षा आहे.