सनी लिऑनला निर्माते कोर्टात खेचणार ?

By Admin | Updated: July 12, 2016 08:26 IST2016-07-12T08:26:41+5:302016-07-12T08:26:41+5:30

बॉलिवुडची सुपर हॉट, बोल्ड अभिनेत्री सनी लिऑन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एरवी चाहत्यांची झोप उडवणा-या सनीने सध्या निर्मात्यांची झोप उडवली आहे.

Sunny Leone to be produced in court? | सनी लिऑनला निर्माते कोर्टात खेचणार ?

सनी लिऑनला निर्माते कोर्टात खेचणार ?

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १२ - बॉलिवुडची सुपर हॉट, बोल्ड अभिनेत्री सनी लिऑन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एरवी चाहत्यांची झोप उडवणा-या सनीने सध्या निर्मात्यांची झोप उडवली आहे. सनी लिऑनने चित्रपट निर्मात्यांना त्रस्त करुन सोडल्याचे वृत्त आहे. सनीने आपल्या मानधनात अचानक वाढ केली आहे. त्यामुळे निर्माते सनीवर नाराज झाले आहेत. 
 
सनीची डिमांड अचानक वाढल्यामुळे चित्रपटाचे शूटींगही रखडले आहे. काही निर्मात्यांकडून सनीने सायनिंगची रक्कमही घेतली होती. ही रक्कम परत करायला सनीने नकार दिल्याचे वृत्त आहे. 
 
आणखी वाचा 
सिंगल आहात, खुशाल वन नाईट स्टँडची मजा लुटा - सनी लिऑन
सनी लिऑनला विणकामाचीही हौस
 
त्यामुळे ज्यांचे पैसे अडकले आहेत असे निर्माते सनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत. ते सनी विरोधात न्यायालयात खटला दाखल करु शकतात. यापूर्वीही सनी विरोधात तिच्या बोल्ड इमेजमुळे पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. 
 
पॉर्नस्टार ते चित्रपट अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनीचा भारताता मोठा चाहतावर्ग आहे. हिट चित्रपट तिच्या नावावर नसले तरी, तिच्या नावामुळे चित्रपट चालतात, चर्चेत येतात हे सुद्धा नाकारता येणार नाही. 
 

Web Title: Sunny Leone to be produced in court?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.