न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये भाग घेणारी सनी लिओनी ठरणार पहिली बॉलिवूड अभिनेत्री

By Admin | Updated: September 4, 2016 21:54 IST2016-09-04T21:50:00+5:302016-09-04T21:54:41+5:30

न्यूयॉर्कमध्ये होणा-या फॅशन वीकमध्ये ती सहभागी होणार आहे

Sunny Leone to be part of the New York Fashion Week, the first Bollywood actress to be nominated | न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये भाग घेणारी सनी लिओनी ठरणार पहिली बॉलिवूड अभिनेत्री

न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये भाग घेणारी सनी लिओनी ठरणार पहिली बॉलिवूड अभिनेत्री

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - एकेकाळी पॉर्न इंडस्ट्री गाजवणारी अभिनेत्री सनी लिओनीनं बॉलिवूडमध्ये येऊन चार वर्षांत चांगला जम बसवला आहे. 35 वर्षांची असलेली सनी लिओनी जिस्म 2 या चित्रपटात झळकली आणि अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आली. आता न्यूयॉर्कमध्ये होणा-या फॅशन वीकमध्ये ती सहभागी होणार आहे.

विशेष म्हणजे न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये सहभागी होणारी ती पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरणार आहे. 8 सप्टेंबर 2016 रोजी न्यूयॉर्क फॅशन वीक होणार आहे. सनी लिओनी आता न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये प्रसिद्ध डिझायनर अर्चना कोचर यांच्यासाठी रॅम्प वॉक करणार आहे. या रॅम्प वॉकच्या बातमीमुळे सनी लिओनी फारच खूश झाली आहे. तिनं ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करून याबाबत आनंद व्यक्त केला आहे. "माझं स्वप्न सत्यात उतरणार आहे. मी न्यूयॉर्क फॅशन वीक एसएस 17 मध्ये अर्चना कोचर यांच्या 'शो'निमित्त भाग घेणार आहे." अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

यावेळी प्रसिद्ध फॅशन झिझायनर अर्चना कोचर यांचेही सनीने आभारही मानले आहेत. अर्चना कोचर यांनीही ट्विट करून आनंदाला मोकळी वाट करून दिली आहे. त्या म्हणाल्या "काऊंटडाऊन सुरू झालं आहे. माझं काम सुरू आहे. फॅशन वीकसाठी फक्त 5 दिवस आहेत."

Web Title: Sunny Leone to be part of the New York Fashion Week, the first Bollywood actress to be nominated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.