सनी इमरानसाठी बनली जिप्सी?

By Admin | Updated: August 26, 2016 06:54 IST2016-08-26T06:54:37+5:302016-08-26T06:54:37+5:30

अजय देवगण आणि इमरान हाश्मी यांचा आगामी चित्रपट बादशाहोचे फर्स्ट शेड्यूल नुकतेच सुरू करण्यात आले.

Sunny Imran made gypsy? | सनी इमरानसाठी बनली जिप्सी?

सनी इमरानसाठी बनली जिप्सी?


अजय देवगण आणि इमरान हाश्मी यांचा आगामी चित्रपट बादशाहोचे फर्स्ट शेड्यूल नुकतेच सुरू करण्यात आले. मुंबईच्या स्टुडीओत इमरान हाश्मी आणि सनी लिओनी चित्रीत गाणे शूट करण्यात आले. गेल्या चार-पाच दिवसांपासून या गाण्याचे शूटींग सुरू होते.

यात सनी बंजारा लूक मध्ये दिसत आहे. दिग्दर्शक मिलन लुथरिया म्हणाले, मी गेल्या वर्षी सनीला भेटलो आणि त्यानंतर मला जे सुचलं त्यामुळे मी खुपच आश्चर्यचकित झालो. सनी आणि इमरान हाश्मी हे युनिक समीकरण मला या चित्रपटात करावे वाटले.

तिच्यासोबत काम करणे कुठल्याही स्वप्नापेक्षा कमी नव्हते. विजय आणि डिम्पल गांगुली यांनी कोरिओग्राफ केलेल्या गाण्यावर ते दोघे डान्स करतांना दिसतील. देवगण, इलियाना डिक्रुझ आणि इशा गुप्ता हे या दोघांना नोव्हेंबर महिन्यात राजस्थानमध्ये दुसऱ्या शेड्यूलमध्ये भेटतील.

Web Title: Sunny Imran made gypsy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.