Video: चालू कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर फेकली बॉटल, गायिकेने दिलं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 11:54 AM2024-05-05T11:54:44+5:302024-05-05T11:55:10+5:30

म्यूझिक कॉन्सर्ट चालू असताना सुनिधीवर बॉटल फेकण्याचा संतापजनक प्रकार घडला. सुनिधीने काय केलं बघा (sunidhi chauhan)

Sunidhi Chauhan reacts as fan throws water bottle at her during live concert | Video: चालू कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर फेकली बॉटल, गायिकेने दिलं सणसणीत उत्तर

Video: चालू कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर फेकली बॉटल, गायिकेने दिलं सणसणीत उत्तर

गायिका सुनिधी चौहान ही भारतातील सगळ्यांची आवडती गायिका. सुनिधीने आजवर अनेक गाण्यांतून प्रेक्षकांचं मन जिंकलं. सुनिधीने बॉलिवूडच नव्हे तर अनेक भाषांमधील सिनेमांमधून गाणी गायली. सुनिधीने सनई चौघडे सिनेमात गायलेलं कांदेपोहे हे मराठी गाणं सर्वांचं फेव्हरेट. सुनिधीसोबत नुकतीच एका कॉन्सर्टमध्ये घटना घडलीय. चालू कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने सुनिधीला बॉटल फेकून मारली. मग पुढे काय घडलं बघा...

काय घडली घटना?

अलीकडेच सुनिधी चौहानने डेहराडूनमधील एका कॉलेजमध्ये दमदार परफॉर्मन्स दिला. स्वतःची लोकप्रिय गाऊन सुनिधी कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होती. मात्र, गाणं गात असतानाच सुनिधीला चाहत्यांच्या गैरवर्तनाला सामोरे जावे लागले. एका प्रेक्षकाने सुनिधीवर पाण्याची बाटली फेकली. अचानक पाण्याची बाटली समोर आल्याने सुनिधीला मोठा धक्का बसला. मग पुढे सुनिधीनेही तिच्या कृतीने सर्वांना सणसणीत उत्तर दिलं.

सुनिधीने दिलं सणसणीत उत्तर

अचानक ही घटना घडल्यावर कोणालाही राग आला असता. पण सुनिधीने परफॉर्मन्स न थांबवता गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवादात्मक हावभाव केले. तिने हे सर्व प्रकरण शांतपणे हाताळलं. लोकांकडून फेकलेल्या बाटलीला तिने शांतपणे उत्तर दिलं आणि म्हणाली, "हे काय होत आहे? बाटली फेकली तर काय होईल? शो बंद होईल, तुम्हाला ते हवे आहे का?" आणि लोकांनी नाही असं म्हणत सुनिधीला सपोर्ट केला. सुनिधीच्या या वागण्याचं खूप कौतुक होतंय.

Web Title: Sunidhi Chauhan reacts as fan throws water bottle at her during live concert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.