सुलतानची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई, जमवला ४० कोटींचा गल्ला
By Admin | Updated: July 7, 2016 12:36 IST2016-07-07T12:34:39+5:302016-07-07T12:36:12+5:30
बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या 'सुलतान'ने पहिल्याच दिवशी ४० कोटींचा गल्ला जमवला आहे.

सुलतानची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई, जमवला ४० कोटींचा गल्ला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान याचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित 'सुलतान' चित्रपट अखेर प्रदर्शित झाला असून ईदच्या मुहुर्तावर रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करत ४० कोटींचा गल्ला जमवला आहे. बुधवारी (६ जुलै) हा चित्रपट प्रदर्शित झाला असून येत्या ५ दिवसांतच (वीकेंडसह) हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा सहज पार करेल असे मत इंडस्ट्रीतील तज्ज्ञांनी व्यक्त केले.
ट्रेड अॅनॅलिस्ट तरण आदर्श यांच्यानुसार, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ४० कोटींची कमाई केली असून येत्या ५ दिवसात मोठा गल्ला गोळा करेल. सलमान व अनुष्का शर्माची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एकूण ५४५० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला असून भारतात ४३५० स्क्रीन्स तर परदेशात ११०० स्क्रीन्स आहेत.
सुलतान' चित्रपटात सलमान खानने एका कुस्तीपटूची भुमिका निभावली आहे. हरियाणामधील छोट्या गावात राहणारा सुलतान आयुष्यात एक घटना घडते आणि त्यानंतर कुस्तीपटू होऊन एक दिवस वर्ल्ड चॅम्पिअन बनतो, व त्यानंतर आणखी एका घटनेमुळे पेहलवानी सोडून देतो. अशी या चित्रपटाची कथा आहे.
#Sultan [Wed biz / pre-Eid]: ₹ 40 cr+ definitely... 41... 42... 43... It can touch these figures... Final numbers coming up... FANTABULOUS!— taran adarsh (@taran_adarsh) July 7, 2016
#Sultan - Final Screen Count:
India - 4350 Screens
Overseas - 1100 Screens
Total - 5450 Screens— taran adarsh (@taran_adarsh) July 6, 2016