असा असायचा कपिल शर्माचा सेटवर अंदाज, आता राहिल्या फक्त 'त्या' आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 14:43 IST2017-03-31T09:00:58+5:302017-03-31T14:43:06+5:30
कॉमेडियन कपिल शर्माने कॉमेडी नाईटस विथ कपिल या शोच्या माध्यमातून अमाप लोकप्रियता मिळवली. कॉमेडी नाईटस विथ कपिल शो घराघरात ...

असा असायचा कपिल शर्माचा सेटवर अंदाज, आता राहिल्या फक्त 'त्या' आठवणी
क मेडियन कपिल शर्माने कॉमेडी नाईटस विथ कपिल या शोच्या माध्यमातून अमाप लोकप्रियता मिळवली. कॉमेडी नाईटस विथ कपिल शो घराघरात हिट ठरला. त्यानंतर काही कारणामुळे हा शो 'द कपिल शर्मा' या नावाने सुरू झाला.मात्र या शोची लोकप्रियता कायम राहिली.या शो पाहायला येणा-या अनेक चाहत्यांनी तर फक्त कपिलच्या शोममुळे त्यांचे आजारपण दूर झाल्याचेही सागायचे. छोट्या पडद्यावर हा नंबर वन शो कॅटगरित गणाला जावू लागला. कपिलच्या कॉमेडीनेच रसिकांना त्यांचे दु:ख विसरून पुन्हा एकदा दिलखुलास हसायला शिकवलं.मात्र आता कॉमेडी किंग कपिल शर्माचा हास्याचा दरबार लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे आता फक्त कपिल शर्मासह रसिकांच्या मनात आठवणीच राहणार असेच दिसतंय. हा शो बंद होवू नये यासाठी अनेक प्रयत्न केल्याचे टीमचे म्हणणे आहे. आता फक्त सुनील ग्रोव्हर, अली असगर, चन्दन प्रभाकर हे तिघेच या शोला वाचवू शकतात,जे शक्य नाहीय कारण कपिल शर्माचा शो सोडल्यानंतर लगेचच अली अलगरने 'त्रिदेवीयाँ' शोसाठी शूटिंग सुरू केले आहे. तसेच सुनील ग्रोव्हरही त्याचा एक नवीन कॉमेडी शो 'डॉ. मशहूर गुलाटी कॉमेडी क्लिनिक' सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता कपिल एकटा पडला आहे. त्यामुळे कपिल शर्माचे शोचे भविष्य अंधारात असल्याचे बोलले जात आहे.
![]()
![]()
![]()
![]()
![]()