​ सलमानचा ‘बॉडीगार्ड’ शेराविरूद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 15:14 IST2016-10-26T15:12:32+5:302016-10-26T15:14:52+5:30

सलमान खानला सावलीसारखा सोबत करणारा शेरा अर्थात गुरमीत सिंह जॉली या सलमानच्या अंगरक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीतील ...

Submitted to Salman's bodyguard shahra | ​ सलमानचा ‘बॉडीगार्ड’ शेराविरूद्ध गुन्हा दाखल

​ सलमानचा ‘बॉडीगार्ड’ शेराविरूद्ध गुन्हा दाखल

मान खानला सावलीसारखा सोबत करणारा शेरा अर्थात गुरमीत सिंह जॉली या सलमानच्या अंगरक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरीतील गुलमोहर मार्गावरील एका हुक्का पार्लरमध्ये वेटरला मारहाण केल्याप्रकरणी डीएन नगर पोलिस स्थानकात त्याच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी शेराला ताब्यात घेण्यात आल्याचीही खबर आहे. ही घटना मंगळवारी रात्रीची आहे. हुक्का पार्लरमध्ये शेराने पीडित वेटरला थप्पड लगावत त्याला जबर मारहाण केली. शिवाय बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचाही आरोप आहे. अर्थात शेराने असे काहीही नसल्याचे म्हटले असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
गत १८ वर्षांपासून शेरा सलमानच्या अंगरक्षकाचे काम करतो आहे. सलमान कुठेही असो, शेरा सावलीसारखा त्याच्या सोबत असतो. शेराला सलमान स्वत:च्या कुटुंबातीलच एक मानतो. शेराची स्वत:ची ‘टायगर सिक्युरिटी कंपनी’ आहे. या कंपनीद्वारे तो सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवतो. शेराचा मुलगा टायगर हा बॉलिवूडमध्ये येण्यास उत्सूक आहे. सलमान त्याला लॉन्च करणार, अशी मध्यंतरी चर्चा होती. 
 सलमानच्या आधी शेरा भारतात येणा-या हॉलिवूड स्टार्सला सुरक्षा पुरवायचा. सलमानला जिथे जायचे असते, तिथे शेरा एक दिवस आधीच पोहोचतो. अनेकदा सलमानच्या सुरक्षेसाठी शेराला पाच-पाच किमी पायी चालावे लागते. बॉडी बिल्डींगमध्ये ज्युनिअर मिस्टर मुंबई आणि ज्युनिअर मिस्टर महाराष्ट्र यासारखे किताब जिंकणारा शेरा सलमानला शेरा भाई म्हणून बोलवतो. सलमान च्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटात शेरा कॅमिओ करताना दिसला होता. चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमध्ये शेरा गातांना आणि थिरकला होता.
 

Web Title: Submitted to Salman's bodyguard shahra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.