चित्रंगदाचा अस्तित्वासाठी संघर्ष
By Admin | Updated: October 1, 2014 01:36 IST2014-10-01T01:36:54+5:302014-10-01T01:36:54+5:30
सुधीर मिश्रच्या ‘हजारो ख्वाईशे ऐसी’ या चित्रपटाद्वारे कारर्कीर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री चित्रंगदा सिंग आता अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे.

चित्रंगदाचा अस्तित्वासाठी संघर्ष
>सुधीर मिश्रच्या ‘हजारो ख्वाईशे ऐसी’ या चित्रपटाद्वारे कारर्कीर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री चित्रंगदा सिंग आता अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. चांगले रोल मिळावेत यासाठी चित्रंगदाचा आटापिटा सुरू आहे. अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम यांच्यासोबतचा ‘देसी बॉईज’ हा तिचा अखेरचा मोठा चित्रपट होता. त्यानंतर काही किरकोळ भूमिका, तसेच आयटम साँग साकारताना ती दिसून आली होती. ‘माङो करिअर सध्या टॉप गीअरला नसेल, परंतु अजूनही आशा पल्लवित आहेत, गुणवत्ता नसती तर मी एवढी मजल मारलीच नसती, चांगले रोल मिळण्याची मी कायम प्रतीक्षा केली आहे,’ असे चित्रंगदाने सांगितले. आयटम साँग करण्याचा आपणास कसलाही पश्चात्ताप होत नसल्याचेही तिने स्पष्ट केले. स्वत:तील कला वेगळ्या प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न आयटम साँगद्वारे केल्याचे चित्रंगदाने सांगितले.