सुनील शेट्टीने खरेदी केली पहिली इलेक्ट्रीक कार; जाणून घ्या त्याची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 01:55 PM2023-12-26T13:55:53+5:302023-12-26T13:56:28+5:30

Suniel shetty: सुनीलने इन्स्टाग्रामवर त्याच्या नव्या कारसोबतचा फोटो शेअर केला आहे.

story-sunil-shetty-bought-his-first-electric-car-mg-comet-ev-and-posted-it-on-instagram | सुनील शेट्टीने खरेदी केली पहिली इलेक्ट्रीक कार; जाणून घ्या त्याची किंमत

सुनील शेट्टीने खरेदी केली पहिली इलेक्ट्रीक कार; जाणून घ्या त्याची किंमत

बॉलिवूड कलाकार कायमच त्यांच्या लक्झरी लाइफमुळे चर्चेत येत असतात. यात खासकरुन त्यांचे डिझायनर कपडे, महागड्या गाड्या यांची चर्चा होते. सध्या अशीच चर्चा अभिनेता सुनील शेट्टीची होताना दिसत आहे. अलिकडेच सुनील शेट्टीने पहिली इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही माहिती चाहत्यांना दिली. 

सुनील शेट्टीने एमजी कॉमेट (MG Comet EV) ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. एमजी मोटर्सच्या गाडीची स्टार्टींग प्राईज ७.९८ लाख रुपयांपासून १०.६३ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरुम) आहे. विशेष म्हणजे जवळपास ८ वर्ष आणि १,२०,००० किलोमीटरपर्यंत या गाडीच्या बॅटरीची वॉरंटी आहे. या गाडीसोबतचा फोटो शेअर करत सुनीलने त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

'माझी पहिली EV एमजी कॉमेट...हिच्यावर प्रेमाचा वर्षाव करा', असं कॅप्शन देत सुनीलने या गाडीचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, या गाडीच्या एक्सटीरियरमध्ये १७ हॉट स्टॅपिंग पॅनल, ड्युअल फ्रंट एअरबॅग, ABS+ABD टेक्नॉलॉजी, रिअर पार्किंग कॅमेरा, सेन्सर आणि ISOFIX चाइल्ड सीट यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तसंच यात आय-स्मार्ट सिस्टीम, 55 पेक्षा जास्त कनेक्टेड कार फिचर्स,१०० पेक्षा जास्त व्हॉइस कमांड सुद्धा आहे. या गाडीला एक हजार किलोमीटरसाठी केवळ ५१९ रुपये इतकाच चार्जिंगचा खर्च येणार आहे.
 

Web Title: story-sunil-shetty-bought-his-first-electric-car-mg-comet-ev-and-posted-it-on-instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.