नर्गिसच्या जाहिरातीवरून वादळ
By Admin | Updated: December 24, 2015 08:46 IST2015-12-24T01:14:46+5:302015-12-24T08:46:50+5:30
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने आघाडीच्या पाकिस्तानी उर्दू वृत्तपत्र ‘जंग’मध्ये दिलेल्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर जोरदार वादळ उठले आहे.

नर्गिसच्या जाहिरातीवरून वादळ
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने आघाडीच्या पाकिस्तानी उर्दू वृत्तपत्र ‘जंग’मध्ये दिलेल्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर जोरदार वादळ उठले आहे. लोकांनी या प्रकाराला सवंग प्रसिद्धीचा एक फंडा सांगितले आहे. पत्रकारांसह अनेकांनी या प्रकारावर टिष्ट्वटरवरून टीका केली आहे. हा अतिशय अश्लील प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या जाहिरातीत नर्गिस लाल पोशाखात झोपलेली दिसत असून तिच्या हातात मोबाईल आहे. पाकिस्तानी पत्रकार अन्सार अब्बासी यांनी सर्वप्रथम या प्रकाराविरुद्ध तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यांनी जाहिरातीबद्दल जंग वृत्तपत्राचा निषेध केला. त्या पाठोपाठ अनेकांनी अशीच संतप्त प्रतिक्रिया दिली.