मास्क लावून लोकलमधून फिरला हा स्टार
By Admin | Updated: March 8, 2017 22:10 IST2017-03-08T22:10:09+5:302017-03-08T22:10:09+5:30
स्टार अभिनेत्यांकडून सध्या पब्लिसिटीसाठी वेगवेगळे हातखंडे आजमावले जातात. सिनेमाच्या प्रमोशनसाठीही जरा हटके क्लुप्त्या

मास्क लावून लोकलमधून फिरला हा स्टार
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - स्टार अभिनेत्यांकडून सध्या पब्लिसिटीसाठी वेगवेगळे हातखंडे आजमावले जातात. सिनेमाच्या प्रमोशनसाठीही जरा हटके क्लुप्त्या लढवण्यात येत असतात. आता आपल्या आगामी मुन्ना मायकल या सिनेमाच्या प्रमोशनसाठी टायगर श्रॉफ मेहनत घेत आहे. या प्रमोशनचाच एक भाग म्हणून टायगर श्रॉफने मास्क लावून ट्रेनमधून प्रवास केला. या दरम्यान, तो ट्रेनमधून फिरत होता. मात्र या दरम्यान त्याला कुणीच ओळखू शकले नाहीत
टायगरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो लोकलमधून फिरताना दिसत आहे. वसईला टायगरच्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होते, ते आटोपून तो कारने वसई स्टेशनवर आला. तिथून वसई ते वांद्रे हा प्रवास त्याने लोकलमधून केला. आपल्या लाडक्या हिरोशी मिळता जुळता चेहरा असणारा कुणी दिसला तर चाहते त्याचा पाठलाग करतात. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे लोकल प्रवासादरम्यान टायगरला कुणीही ओळखू शकले नाही.