स्टार किड्सची रुपेरी पडद्यावर लवकरच एन्ट्री

By Admin | Updated: September 10, 2015 04:26 IST2015-09-10T04:26:23+5:302015-09-10T04:26:23+5:30

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘हीरो’ चित्रपटातून दोन स्टार किड्सनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. आथिया (सुनील शेट्टीची कन्या) व सूरज (आदित्य पांचोलीचा पुत्र) या सिनेमाद्वारे

Star Kids Starry Entries Soon | स्टार किड्सची रुपेरी पडद्यावर लवकरच एन्ट्री

स्टार किड्सची रुपेरी पडद्यावर लवकरच एन्ट्री

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘हीरो’ चित्रपटातून दोन स्टार किड्सनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. आथिया (सुनील शेट्टीची कन्या) व सूरज (आदित्य पांचोलीचा पुत्र) या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकले आहे. याच क्रमात आणखीही काही नावे असून येणाऱ्या काळात तेदेखील आपल्या आई-वडिलांसारखे अभिनय करताना दिसतील.
या लिस्टमध्ये सनी देओलचा मुलगा करण याचे नाव सर्वांत वर आहे. करणच्या लाँचिंगची तयारी मागील दोन वर्षांपासून सुरू झाली आहे. सध्या तो ट्रेनिंग घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘घायल रिटर्न’नंतर करणचा सिनेमा येणार असल्याचे सनी देओलने सांगितले आहे. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन लवकरच रुपेरी पडद्यावर दिसेल. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मर्जिया’ या चित्रपटात तो काम करतोय. सुश्मिता सेनची मुलगी रिनी हिच्या लाँचिंगची चर्चादेखील सुरू आहे. सुश्मिताने दत्तक घेतलेल्या रिनीच्या लाँचिंगसाठी करण जोहरशी तिने संपर्क साधाला असून सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
श्रीदेवीची मुलगी जान्हवी हिचीदेखील चर्चा सध्या जोरात आहेच. बोनी कपूरने तिला योग्य वेळी सिनेमात लाँच केले जाईल, असे सांगितले आहे. सैफ अली खानची अपत्ये लवकरच कॅमेऱ्याच्या समोर असतील. मुलगी सारा व मुलगा इब्राहिम या दोघांवरही बॉलीवूडच्या नजरा आहेत. सैफ म्हणतो, आधी दोघांनी आपले शिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर इब्राहिम व साराला लाँच केले जाईल.
आमीर खानचा मुलगा जुनैद हादेखील सिनेमात येणार असल्याची चर्चा आहे. आमीरच्या प्रोडक्शन कंपनीत लाँचिंगच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. मात्र आमीर याबाबत स्पष्ट बोलत नसला तरी तो चित्रपटात हीरो असेल असे सांगण्यात येत आहे. २०१८ मध्ये जुनैद इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवणार, याशिवाय मुलगी इरादेखील सिनेमात येण्यास इच्छुक मानली जात आहे. सुनील शेट्टीचा मुलगा आहान यालाही सिनेमात आणण्यासाठी स्वत: सुनील शेट्टी तयारी करीत आहे. दोन वर्षांनंतर तो सिनेमात दिसेल. विनोद मेहराचा मुलगा रोहनदेखील सिनेमात काम करणार असल्याची माहिती आहे. त्याला दिग्दर्शक निखिल अडवानी लाँच करणार असल्याचे बोलले जाते. रोहन सध्या निखिल अडवानी दिग्दर्शित ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटाचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहतोय. विनोद खन्नाचा मुलगा साक्षी (विनोद खन्नाची दुसरी पत्नी कविता हिचा मुलगा) याच्या लाँचिंगची तयारी सुरू आहे. साक्षीच्या लाँचिंगसाठी सलमान खान गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. गोविंदाची मुलगी नम्रताने चित्रपटात टीना या नावाने लाँचिंग झाले. त्याचा मुलगा यशवर्धन हादेखील सिनेमात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: Star Kids Starry Entries Soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.