'बाहुबली'चा दिलदारपणा! ICU मध्ये असलेल्या अभिनेत्याला प्रभासने दिला मदतीचा हात, केली 'इतक्या' लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 10:37 IST2025-07-06T10:36:34+5:302025-07-06T10:37:43+5:30
हीच खरी माणुसकी! ICU मध्ये दाखल असलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्याला प्रभासने दिला मदतीचा हात, केली इतक्या लाखांची मदत

'बाहुबली'चा दिलदारपणा! ICU मध्ये असलेल्या अभिनेत्याला प्रभासने दिला मदतीचा हात, केली 'इतक्या' लाखांची मदत
Prabhas: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) हा त्याच्या व्यवसायिक आणि वैयक्तिक आष्युष्यामुळे कायम चर्चेत असतो. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही या अभिनेत्याने त्याच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अशातच प्रभासने केलेल्या एका कृतीचं सर्वत्र कौतुक होतंय. सध्या टॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते फिश वेंकट हे एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. किडनी निकामी झाल्याने त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यासाठी त्यांना डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत फिश वेंकट यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संकटांचाही सामना करावा लागत आहे. अशा कठीण वेळी, सुपरस्टार त्यांचा कुटुंबीयांसाठी देवदूत बनून प्रभास धावून आला आहे.
अभिनेते फिश वेंकट यांची मुलगी श्रावंतीने माध्यमांशी बोलाताना याबाबत माहिती सांगितली. या कठीण प्रसंगी सुपरस्टार प्रभास त्यांच्या मदतीसाठी धावून आला आणि ५० लाख रुपयांची मदत केली. त्याच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्याविषयी बोलताना श्रावंती म्हणाली, "माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर आहे. सध्या ते आयसीयूमध्ये आहेत आणि त्यांना किडनी ट्रान्सप्लांची आवश्यकता आहे. त्यासाठी जवळपास ५० लाख रुपये इतका खर्च आहे. प्रभासच्या असिस्टंटने आम्हाला फोन केला आणि आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे."
त्यानंतर तिने सांगितलं, "प्रभासच्या मदतीने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, परंतु आमच्यासमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे किडनी डोनर शोधण्याचं आहे. काही कारणास्तव कुटुंबातील कोणालाही त्यांना किडनी डोनेट करू शकत नाही. त्यामुळे, किडनी डोनरचा शोध अद्यापही सुरू आहे." असं तिने सांगितलं.
कोण आहेत फिश वेंकट?
फिश वेंकट हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. त्यांनी आजवरच्या कारकिर्दीत 'बनी', 'अधर्स', 'गब्बर सिंग' आणि 'धी' सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ते आपल्या खास विनोदीशैलीसाठी सुद्धा ओळखले जातात.