रश्मिकासोबत लग्न करण्याच्या चर्चांवर विजय देवरकोंडाने अखेर सोडलं मौन, म्हणाला- "मला तिच्याबरोबर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 18:06 IST2025-05-17T18:04:20+5:302025-05-17T18:06:42+5:30
रश्मिकासोबत लग्न करण्याच्या चर्चांना विजय देवरकोंडाने दिला पूर्णविराम, म्हणाला...

रश्मिकासोबत लग्न करण्याच्या चर्चांवर विजय देवरकोंडाने अखेर सोडलं मौन, म्हणाला- "मला तिच्याबरोबर..."
Vijay Deverkonda : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) हा त्याच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. लवकरच अभिनेता त्याचा आगामी चित्रपट 'किंगडम' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने विजय देवरकोंडा व्यस्त असल्याचा पाहायला मिळतोय. याचदरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिनेत्याने दिलेल्या उत्तर अनेकांचं लक्ष वेधलंय.
'फिल्म फेअर'ला दिलेल्या दिलेल्या मुलाखतीमध्ये विजय देवरकोंडाला इंडस्ट्रीत तो रश्मिका मंदानाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. या बातम्या खऱ्या आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, "याबद्दल तुम्ही त्याच लोकांना विचारा." असं स्पष्ट शब्दांत सांगत अभिनेत्याने या अफवांचं खंडण केलं. त्यानंतर रश्मिका सोबत त्याच्या केमिस्ट्रीबाबत विजय देवरकोंडाने सांगितलं की, "रश्मिकासोबत मी फारसे चित्रपट केलेले नाहीत. पण, मला तिच्याबरोबर आणखी काम करायला आवडेल. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. ती एक सुंदर स्त्री आहे. त्यामुळे आमच्यामधील केमिस्ट्रीबद्दल वेगळं वाटण्यासारखं काही नाही. "
त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाल ,"ती खूप मेहनती आहे. रश्मिका तिची इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाच्या बळावर कोणत्याही संकटावर मात करु शकते. याशिवाय ती खूप दयाळू आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखाला जास्त प्राधान्य देते. त्याचबरोबर विजयला लग्नाबद्दल विचारलं असताना तो म्हणाला, हो, कधीतरी मी नक्कीच लग्न करेन." त्यात आता अभिनेत्याच्या या वक्तव्याची सगळीकडे चर्चा होताना दिसते.