आत्महत्येनंतर शोभिताची शेवटची पोस्ट होतेय व्हायरल, अभिनेत्री घरात आढळली मृतावस्थेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 13:52 IST2024-12-02T13:51:56+5:302024-12-02T13:52:26+5:30
Shobitha Shivanna : शोभिताने अचानक स्वतःचं आयुष्य का संपवलं, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आत्महत्येनंतर शोभिताची शेवटची पोस्ट होतेय व्हायरल, अभिनेत्री घरात आढळली मृतावस्थेत
प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना(Shobitha Shivanna)चे निधन झाले आहे. लग्नानंतर ती हैदराबादमध्ये राहात होती. ती मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत होती. अभिनेत्री शोभिता शिवन्ना हिने २ वर्षांपूर्वी नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. शोभिताच्या मृत्यूमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र तिच्या चाहत्यांना तिच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला आहे. दरम्यान, अभिनेत्रीची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
न्यूज १८ कन्नडच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री शोभिता शिवन्नाचा पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कर्नाटकातील त्यांचे कुटुंबीय शोभिताच्या हैदराबाद येथील घरी पोहोचले आहेत. अभिनेत्रीच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीची शेवटची पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बेवफाईच्या गाण्याचा उल्लेख आहे.
अभिनेत्रीची शेवटची पोस्ट चर्चेत
शोभिता शिवन्नाची शेवटची पोस्ट एका गायिकेची आहे जो 'इंताहा हो गई इंतेझार की' हे प्रसिद्ध हिंदी गाणे गाताना दिसतो आहे. लोक कमेंट करत आहेत आणि विचारत आहेत की तिने आत्महत्या केली हे खरे आहे का? लोक दु:खी आहेत आणि तिला श्रद्धांजली वाहतात. अभिनेत्रीने कन्नड चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. 'अटेम्प्ट टू मर्डर' आणि 'जॅकपॉट' यांसारख्या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली आहे.
लग्नानंतर शोभिता शिवन्ना राहत होती हैदराबादमध्ये
अभिनेत्रीने ‘मीनाक्षी मुंडाश’ या मालिकेतही काम केले होते. तिने ‘कुक्कू’, ‘गालीपाता’ सारख्या मालिकांमध्येही काम केले. ती शेवटची 'फर्स्ट डे फर्स्ट शो' या चित्रपटात दिसली होती. दोन वर्षांपूर्वी लग्न होऊन ती हैदराबादला स्थायिक झाली. अभिनेत्रीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. काल रात्री तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्रीचे वय फक्त ३० वर्षे होते.