समांथा ही राज निदिमोरुसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार? अभिनेत्रीच्या मॅनेजरनं केला खुलासा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:40 IST2025-05-16T13:37:59+5:302025-05-16T13:40:03+5:30
समांथा आणि राज निदिमोरु यांच्या अफेअरच्या चर्चा, अभिनेत्रीच्या मॅनेजरनं सोडले मौन

समांथा ही राज निदिमोरुसोबत लिव्ह-इनमध्ये राहणार? अभिनेत्रीच्या मॅनेजरनं केला खुलासा, म्हणाली...
Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru: अभिनेत्री समांथा रूथ प्रभू ही दक्षिण चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमधील एक लोकप्रिय नाव आहे. समांथाने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. व्यावसायिक आयुष्यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. सध्या समांथा तिच्या डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. समांथाचे नाव काही दिवसांपासून चित्रपट निर्माते राज निदिमोरू यांच्याशी जोडलं जात आहे. समांथाने राज निदिमोरू यांच्यासोबत काढलेला सेल्फी शेअर केला होता. त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांनी पुन्हा जोर धरला आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या मॅनेजरनं समांथा आणि राज निदिमोरु यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
नुकतंच समांथाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये समांथा ही विमानामध्ये राज निदिमोरूसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. या सेल्फीमध्ये तिनं राजच्या खांद्यावर डोके ठेवलेलं पाहायला मिळालं. या फोटोमध्ये दोघांची जवळीक पाहिल्यावर त्याच्या नात्याची चर्चा होत आहे. एवढेच नाही तर रिपोर्ट्समध्ये असेही म्हटलं गेलंय की ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार करत आहेत. त्यासाठी त्यांनी नवीन घरही शोधण्यासही सुरुवात केली आहे. पण, यातच आता समांथाच्या मॅनेजरने या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व निव्वळ अफवा असल्याचं तिनं स्पष्ट केलंय.
दरम्यान, राज निदिमोरु यांचं याआधीच लग्न झालेलं आहे. पण, त्यांचा घटस्फोट झाल्याचीही बोललं जात आहे. तर समांथानं याआधी अभिनेता नागा चैतन्यसोबत लग्न केलं होतं, पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर दोनच वर्षात नागा चैतन्य यानं शोभिता धुलिपालासोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. समांथा आणि राज यांनी 'द फॅमिली मॅन' सीझन २ मध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर दोघेही 'सिटाडेल हनी-बनी'साठी एकत्र आले. आता ते 'रक्त ब्रह्मांड' मध्येही एकत्र काम करणार आहेत.