घटस्फोटाच्या ४ वर्षांनंतर समांथा रुथ प्रभू पुन्हा पडली प्रेमात?, म्हणाली - "नवीन सुरूवात.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:06 IST2025-05-08T11:06:09+5:302025-05-08T11:06:29+5:30
Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभू हिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिचा निर्माती म्हणून पहिला सिनेमा 'शुभम' ९ मे रोजी प्रदर्शित होतो आहे.

घटस्फोटाच्या ४ वर्षांनंतर समांथा रुथ प्रभू पुन्हा पडली प्रेमात?, म्हणाली - "नवीन सुरूवात.."
समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिचा निर्माती म्हणून पहिला सिनेमा 'शुभम' ९ मे रोजी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यग्र आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या आधीच समांथा रुथ प्रभूने इंस्टाग्रामवर बरेच फोटो शेअर केले आहेत. त्यातील काही फोटोत सिनेमाचा क्रूदेखील आहे. तर त्यातील एका फोटोत दिग्दर्शक राज निदिमोरूदेखील दिसत आहे.
समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू यांनी द फॅमिली मॅन आणि सिटाडेल हनी बनीमध्ये एकत्र काम केले आहे. ते पिकलबॉल टीम चेन्नई सुपर चॅम्प्समध्ये भागीदार होते. त्यांच्या नात्याबद्दल बऱ्याच काळापासून बातम्या येत आहेत. आता समांथाच्या पोस्टनंतर चाहते असा अंदाज लावत आहेत की कदाचित अभिनेत्रीने राज इंस्टासोबतचे तिचे नाते अधिकृत केले असेल. परंतु, त्या दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. आता समांथाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ''हा खूप लांबचा प्रवास होता, पण आम्ही इथे आहोत. नवीन सुरुवात. 'शुभम' ९ मे रोजी रिलीज होत आहे.''
नागा चैतन्यसोबत समांथा झाली विभक्त
राजने श्यामली डेशी लग्न केले आहे. दोघांनाही एक मुलगी आहे. त्याच वेळी समांथाचे लग्न अभिनेता नागा चैतन्यशी झाले होते. ४ वर्षांच्या लग्नानंतर २०२१ मध्ये दोघेही वेगळे झाले. नागा चैतन्यशी घटस्फोट झाल्यानंतर समांथ कोलमडून गेली होती. त्यानंतर समंथाने स्वतःला सांभाळले आणि आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. नागा चैतन्यने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. त्याच वेळी, समांथा व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करत आहे.