Salaar Trailer: बहुप्रतीक्षित 'सालार'चा ट्रेलर रिलीज, दमदार अ‍ॅक्शन सीक्वन्ससोबत हटके अवतारात दिसला प्रभास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 10:32 AM2023-12-02T10:32:40+5:302023-12-02T10:33:02+5:30

ज्या क्षणाची बाहुबली फेम प्रभास(Prabhas)चे चाहते वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. होय, प्रभासच्या बहुचर्चित 'सालार' (Salaar Movie) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच निर्मात्यांनी रिलीज केला आहे.

Salaar Trailer: The much awaited 'Saalar' trailer released, Prabhas in a hot avatar with powerful action sequences | Salaar Trailer: बहुप्रतीक्षित 'सालार'चा ट्रेलर रिलीज, दमदार अ‍ॅक्शन सीक्वन्ससोबत हटके अवतारात दिसला प्रभास

Salaar Trailer: बहुप्रतीक्षित 'सालार'चा ट्रेलर रिलीज, दमदार अ‍ॅक्शन सीक्वन्ससोबत हटके अवतारात दिसला प्रभास

ज्या क्षणाची बाहुबली फेम प्रभास(Prabhas)चे चाहते वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. होय, प्रभासच्या बहुचर्चित 'सालार' (Salaar Movie) चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच निर्मात्यांनी रिलीज केला आहे. ३ मिनिटे ४७ सेकंदांच्या रनटाइमसह चित्रपटाचा जबरदस्त प्रोमो पाहण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू या कलाकारांचा समावेश आहे. तेलुगु, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत येणारा हा चित्रपट शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाला टक्कर देणार आहे.

'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत सालारचे दिग्दर्शक प्रशांत नील म्हणाले होते, 'सालार ही दोन मित्रांची कथा आहे जे सर्वात मोठे शत्रू बनतात. मैत्री हा सालारांचा मूळ आत्मा आहे. आम्ही सालार भाग १ मध्ये अर्धी कथा सांगत आहोत. मित्रांचा हा प्रवास आम्ही दोन चित्रपटांतून दाखवणार आहोत. सालारच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना आम्ही निर्माण केलेल्या जगाची झलक पाहायला मिळणार आहे.

'सालार'च्या ट्रेलरमध्ये प्रभासचा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे. टीझरमध्येही अभिनेता वेगळ्या अवतारात दिसला. पण, प्रभाससाठी हा एक मोठा मैलाचा दगड ठरणार आहे. कारण याआधी आलेले त्यांचे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. 'बाहुबली'मधून चमकलेला प्रभास पुन्हा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावेल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Salaar Trailer: The much awaited 'Saalar' trailer released, Prabhas in a hot avatar with powerful action sequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Prabhasप्रभास