'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ला सालारने टाकले मागे, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:30 AM2023-12-22T11:30:38+5:302023-12-22T11:32:25+5:30

प्रभास(Prabhas)चा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'सालार' (Salaar Movie) अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

Salaar beats 'Pathan', 'Jawan' and 'Dunki', strong opening on day one | 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ला सालारने टाकले मागे, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग

'पठाण', 'जवान' आणि 'डंकी'ला सालारने टाकले मागे, पहिल्याच दिवशी केली दमदार ओपनिंग

प्रभास(Prabhas)चा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'सालार' (Salaar Movie) अखेर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. प्रभासचा सालारने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. सालारने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ७० ते ८० कोटींदरम्यान कलेक्शन केले आहे. विकेंडला बाहुबली स्टार प्रभास नवीन रेकॉर्ड बनवणार का, हे पाहावे लागेल. प्रभासच्या 'सालार'च्या आधी काल म्हणजेच २१ डिसेंबरला शाहरुख खानचा 'डंकी' (Dunki Movie) रिलीज झाला आहे. 

सालारचे दिग्दर्शन प्रशांत नीलने केले आहे. चाहत्यांना प्रभासकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांच्या मते, सालार अभिनेत्याच्या करिअरमधील बाहुबली नंतरचा हा पुढचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू शकतो. चित्रपटात प्रभासला हटके अॅक्शन अवतारात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपटात प्रभाससोबत श्रुती हासन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्या दोघांव्यतिरिक्त चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, जगपति बाबू आणि टीनू आनंद हे कलाकार दिसणार आहेत. 

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'सालार'ने 'डंकी'ला टाकलं मागे
विशेष म्हणजे प्रभासच्या सालारने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत शाहरुख खानच्या डंकीला मागे टाकले आहे. इतकेच नाही तर सालार हा यूएसएमध्ये २०२३ मध्ये आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय चित्रपटापेक्षा सर्वाधिक आगाऊ बुकिंग असलेला चित्रपट ठरला आहे. याआधी प्रभास साहो आणि आदिपुरुषमध्ये दिसला आहे.

Web Title: Salaar beats 'Pathan', 'Jawan' and 'Dunki', strong opening on day one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.