राम चरणच्या मुलीचा चेहरा पहिल्यांदाच दिसला; उपासनाने शेअर केला सुट्टीतील गोंडस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 11:45 AM2023-10-30T11:45:03+5:302023-10-30T11:47:20+5:30

सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलीचा गोड चेहरा दिसत आहे. 

Ram Charan's daughter's face seen for the first time; Upasana shared a cute photo | राम चरणच्या मुलीचा चेहरा पहिल्यांदाच दिसला; उपासनाने शेअर केला सुट्टीतील गोंडस फोटो

राम चरणच्या मुलीचा चेहरा पहिल्यांदाच दिसला; उपासनाने शेअर केला सुट्टीतील गोंडस फोटो

'आरआरआर' फेम दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांना २० जून रोजी कन्यारत्न झाले आहे. लग्नाच्या जवळपास ११ वर्षांनी राम आणि उपासना आई-बाबा झाले आहेत. रामचरणने काही दिवसांपूर्वी बाळासोबतचे फोटो शेअर केले होते. पण, त्या फोटोमध्ये कधीच त्यांनी मुलीचा चेहरा दाखवलेला नाही. पण, आता एक फोटो आला आहे. ज्यात राम चरणच्या मुलीचा गोड चेहरा दिसत आहे. 

राम चरण आणि उपासना इटलीतील टस्कनी येथे कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहेत. हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद करत उपासनाने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. उपासनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "कोनिडेला आणि कामिनेनी कुटुंब टस्कनीमध्ये सुट्टी घालवत आहेत. संपूर्ण हृदय एका फ्रेममध्ये". या फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब एका पुलाजवळ पोज देताना दिसत आहेत. 

या फोटोमध्ये राम चरणची मुलगी 'क्लिन कारा' तिच्या आजीच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. जरी उपासनाने मुलीचा चेहरा हार्ट इमोजीने झाकलेला असला तरी पुलाच्या पाण्यात तिचा चेहरा स्पष्टपणे पाहायला मिळतोय. 

राम चरण आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे चुलत भाऊ वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी यांच्या लग्नासाठी इटलीतील टस्कनी येथे गेले आहेत. वरुण आणि लावण्यच्या डेस्टिनेशन वेडिंगला अनेक सेलेब्स उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लग्न 1 नोव्हेंबर 2023 रोजी होणार आहे, तर 30 ऑक्टोबर रोजी कॉकटेल पार्टी आणि 31 ऑक्टोबर रोजी मेहंदी-हळदी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. 
 

Web Title: Ram Charan's daughter's face seen for the first time; Upasana shared a cute photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.