रजनीकांतच्या ‘जेलर’ची हवा! पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई, कमावणार 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 01:33 PM2023-08-10T13:33:13+5:302023-08-10T13:33:59+5:30

Jailer Movie : रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटाने एडव्हान्स बुकिंगमधून रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

rajinikanth jailer movie released will earn 40cr on box office first day | रजनीकांतच्या ‘जेलर’ची हवा! पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई, कमावणार 'इतके' कोटी

रजनीकांतच्या ‘जेलर’ची हवा! पहिल्याच दिवशी करणार रेकॉर्डब्रेक कमाई, कमावणार 'इतके' कोटी

googlenewsNext

सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून थलावया तब्बल दोन वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. रजनीकांत यांच्याबरोबर ‘जेलर’ चित्रपटात तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांचे थिएटरबाहेरील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. रजनीकांत यांच्या ‘जेलर’ चित्रपटाची प्रचंड क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ‘जेलर’ चित्रपटाच्या प्रेक्षक प्रतीक्षेत होते. त्यामुळेच या चित्रपटाच्या एडव्हान्स बुकिंगलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. तामिळनाडूतील तब्बल ९०० चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘जेलर’ चित्रपटाने प्रदर्शनाआधीच एडव्हान्स बुकिंगमधून देशात १४.१८ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या तमिळ व्हर्जनची ५ लाख ९१ हजार २२१ तिकीटे तर तेलुगु व्हर्जनच्या ७७ हजारांहून अधिक तिकिटांची प्रदर्शनाआधीच विक्री झाली.

“नितीन गडकरींना टॅग करुनही...”, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील टोलच्या तक्रारीनंतर मराठी अभिनेत्री नाराज

रजनीकांतच्या या चित्रपटासाठी चेन्नई आणि बंगळूरमधील ऑफिस कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. ‘जेलर’ चित्रपटातील गाणीही सोशल मीडियावर ट्रेंडिग आहेत. रजनीकांतच्या या चित्रपटाची क्रेझ पाहता ‘जेलर’ चित्रपट पहिल्या दिवशी ४० ते ४५ कोटींची कमाई करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ट्रेंड अनालिस्टनुसार हा चित्रपट चार दिवसांत १०० कोटींचा गल्ला जमवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

“शैलेश लोढांनी केस जिंकलेली नाही”, ‘तारक मेहता...’च्या असित मोदींचा दावा, म्हणाले, “त्याने चुकीचं...”

‘जेलर’ चित्रपट हा तमिळ, हिंदी आणि अन्य भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत आणि तमन्नासह जॅकी श्रॉफ, मोहनलाल, योगी बाबू, राम्या कृष्णन या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: rajinikanth jailer movie released will earn 40cr on box office first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.