Pushpa 2 :अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर!! 'पुष्पा २'चा टीझर येणार या दिवशी भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 06:36 PM2024-03-30T18:36:21+5:302024-03-30T18:36:53+5:30

Pushpa 2 : साऊथ सिनेइंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' हा चित्रपट २०२१ साली प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने लोकांचे खूप मनोरंजन केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. 'पुष्पा २' या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Pushpa 2 : Good news for Allu Arjun fans!! The teaser of 'Pushpa 2' will be released on this day | Pushpa 2 :अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर!! 'पुष्पा २'चा टीझर येणार या दिवशी भेटीला

Pushpa 2 :अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर!! 'पुष्पा २'चा टीझर येणार या दिवशी भेटीला

पुष्पा २' (Pushpa 2) चित्रपटाच्या प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अल्लू अर्जुन(Allu Arjun)च्या या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. 'पुष्पा २' चित्रपटाच्या टीझरबाबत नवीन माहिती समोर आली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा २' चित्रपटाचा टीझर अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला म्हणजेच ८ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. अल्लू अर्जुनचा ४२ वा वाढदिवस खास बनवण्यासाठी निर्मात्यांनी 'पुष्पा २' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. २०२३ मध्ये अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी एक खास व्हिडिओ रिलीज केला होता. त्याचवेळी, 'पुष्पा २' चित्रपटातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. 

रश्मिकाने सांगितली 'पुष्पा २'ची कथा
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सुकुमार यांच्याकडे आहे. साउथ अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत पुन्हा एकदा दिसणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान रश्मिका मंदानाने 'पुष्पा २' चित्रपटाच्या कथेबाबत एक मोठे अपडेट दिले होते. तिने सांगितले होते की, चित्रपटातील पात्र मोठ्या संघर्षाचा सामना करताना दिसणार आहे.

कॅमिओ रोलसाठी ही नावं चर्चेत
पुष्पा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. कोरोनाच्या काळात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक होता. पुष्पा २ बद्दल सांगायचे तर, समांथा रुथ प्रभू देखील चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्तचीही खास भूमिका असण्याची शक्यता आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Pushpa 2 : Good news for Allu Arjun fans!! The teaser of 'Pushpa 2' will be released on this day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.