प्रभास आणि रश्मिका मंदानाचा स्क्रीनवर रोमांस! 'अ‍ॅनिमल'नंतर संदीप रेड्डी वांगा बनवणार 'स्पिरिट'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 07:06 PM2024-02-13T19:06:50+5:302024-02-13T19:07:14+5:30

Rashmika Mandanna And Prabhas : रश्मिका आणि प्रभासचा एकत्र हा पहिलाच चित्रपट असून, दोघेही पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत.

Prabhas and Rashmika Mandana's on-screen romance! After 'Animal' Sandeep Reddy Vanga to make 'Spirit' | प्रभास आणि रश्मिका मंदानाचा स्क्रीनवर रोमांस! 'अ‍ॅनिमल'नंतर संदीप रेड्डी वांगा बनवणार 'स्पिरिट'

प्रभास आणि रश्मिका मंदानाचा स्क्रीनवर रोमांस! 'अ‍ॅनिमल'नंतर संदीप रेड्डी वांगा बनवणार 'स्पिरिट'

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ती 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास(Prabhas)सोबत 'स्पिरिट' (Spirit Movie) चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'ॲनिमल'चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा करणार आहेत. रश्मिका आणि प्रभासचा एकत्र हा पहिलाच चित्रपट असून, दोघेही पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत.

Siasat च्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगासोबत रश्मिका मंदानाचा हा दुसरा चित्रपट असेल. याआधी ती त्याच्या 'अ‍ॅनिमल'मध्ये दिसली होती, ज्यामध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी देखील दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

या वर्षी चित्रपटाच्या शूटिंगला होणार सुरूवात
जेव्हा संदीप रेड्डी वांगा यांना स्पिरिट या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, हा चित्रपट या वर्षी फ्लोअरवर जाणार आहे. २०२४च्या अखेरीस चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.

वर्कफ्रंट...
सध्या रश्मिका 'पुष्पा २' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरू आहे. १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. प्रभासबद्दल बोलायचे झाले तर तो शेवटचा 'सालार'मध्ये दिसला होता. आता तो 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहे. यात दीपिका पदुकोण, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखे स्टार्स आहेत. तो यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. तसेच तो 'राजसाब'मध्येही झळकणार आहे.

Web Title: Prabhas and Rashmika Mandana's on-screen romance! After 'Animal' Sandeep Reddy Vanga to make 'Spirit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.