KGF 3 : यशच्या 'केजीएफ ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, या वर्षी रिलीज होणार रॉकी भाईचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 10:24 AM2023-09-30T10:24:35+5:302023-09-30T10:24:55+5:30

KGF 3 : साऊथचा सुपरस्टार यशचा सुपरहिट ठरलेल्या केजीएफच्या तिसऱ्या सीक्वलची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. नुकतीच या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

KGF 3: Big update regarding Yash's 'KGF 3' has come out, Rocky Bhai's movie will be released this year | KGF 3 : यशच्या 'केजीएफ ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, या वर्षी रिलीज होणार रॉकी भाईचा सिनेमा

KGF 3 : यशच्या 'केजीएफ ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, या वर्षी रिलीज होणार रॉकी भाईचा सिनेमा

googlenewsNext

'केजीएफ १' (KGF १) आणि 'केजीएफ २' (KGF २) या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. एकीकडे केजीएफ १ने जगभरात २३८ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर दुसरीकडे केजीएफ २ ने १२१५ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. अशा परिस्थितीत आता दाक्षिणात्य सुपरस्टार यश(Yash)च्या 'केजीएफ ३' (KGF 3) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. होंबळे फिल्म्सच्या प्रवक्त्यानुसार, 'केजीएफ' चा तिसरा भाग २०२५ मध्ये प्रदर्शित करणार आहेत. 

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, होंबळे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी म्हणजेच २०२४ पासून सुरू होणार आहे. होंबळे फिल्म्सचे मालक विजय किरगांडूर यांनी सुपरहिट केजीएफ मालिकेच्या पुढील भागाची रिलीज डेट उघड केली आहे. निर्माते या वर्षाच्या अखेरीस चित्रपटाची घोषणा करतील.या वर्षी २१ डिसेंबर रोजी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. विजय किरगांडूर यांनी सांगितले की पुढील वर्षी ऑक्टोबर २०२४ पासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. त्यांनी सांगितले की, सध्या 'केजीएफ ३' च्या प्री-प्रॉडक्शनवर काम सुरू आहे.

'सालार'शी घट्ट नातं 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रशांत नील प्रभासच्या सालार या चित्रपटात व्यस्त आहेत. यानंतर तो ज्युनियर एनटीआरसोबत एका चित्रपटात काम करणार आहे. यानंतर तो यशचा चित्रपट 'केजीएफ ३' दिग्दर्शित करणार आहे. जवळच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशच्या 'केजीएफ ३' चे प्रभासच्या 'सालार' सोबत घट्ट नाते असल्याचे म्हटले जात आहे. 'सालार'मध्ये यश केमिओ करताना दिसणार असल्याचे वृत्त आहे.

Web Title: KGF 3: Big update regarding Yash's 'KGF 3' has come out, Rocky Bhai's movie will be released this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.