यशच्या 'टॉक्सिक'मध्ये करीना कपूरची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 03:12 PM2024-04-05T15:12:36+5:302024-04-05T15:13:05+5:30

Toxic Movie : केजीएफ आणि केजीएफ सह बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवणारा साऊथचा सुपरस्टार यश सध्या 'टॉक्सिक' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे.

Kareena Kapoor's entry in Yash's 'Toxic', will play this role | यशच्या 'टॉक्सिक'मध्ये करीना कपूरची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

यशच्या 'टॉक्सिक'मध्ये करीना कपूरची एन्ट्री, साकारणार ही भूमिका

केजीएफ (KGF) आणि केजीएफ २ (KGF 2) सह बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवणारा साऊथचा सुपरस्टार यश (Yash) सध्या 'टॉक्सिक' (Toxic) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. दिग्दर्शनाची धुरा गीतू मोहनदास यांच्या हाती आहे. गेल्या काही काळापासून चित्रपटाबाबत रोज काही ना काही अपडेट समोर येत आहेत आणि आता कास्टिंगबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. या चित्रपटात एक नाही तर तीन नायिका दिसणार आहेत, त्यापैकी दोघांची नावेही फायनल झाली आहेत. बॉलिवूडमधून या दोन अभिनेत्रींची निवड करण्यात आली आहे. या अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान आणि कियारा अडवाणी अशी त्यांची नावे आहेत.

'पिंकविला'च्या सूत्रांनुसार, 'टॉक्सिक'मध्ये प्रत्येकी तीन आघाडीच्या अभिनेत्री असतील. करीना कपूर खान आणि कियारा अडवाणी यांचा समावेश करण्यात आला आहे. निर्माते लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही करणार आहेत. या चित्रपटात करीना कपूर यशच्या बहिणीची भूमिका साकारणार असल्याची माहितीही सूत्राने दिली आहे. असे झाले तर करीना या चित्रपटाद्वारे साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करेल.

श्रुती हसनने गायले थीम साँग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माते बऱ्याच काळापासून चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये व्यस्त आहेत. श्रुती हासन या चित्रपटाचा भाग असणार असल्याचीही चर्चा होती. 'टॉक्सिक'चे थीम साँगही तिने गायले आहे. मात्र, याबाबत अद्याप काहीही जाहीर करण्यात आलेले नाही.

काय असेल 'टॉक्सिक'ची कथा?
गोव्यातील समुद्रकिनारी सर्रासपणे सुरू असलेल्या ड्रग कार्टेलवर हा चित्रपट आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडेच, चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये यश दिग्दर्शकासोबत शूटिंग आणि लोकेशनचे नियोजन करताना दिसला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून बराच अवधी आहे. पुढच्या वर्षी २०२५ मध्ये रिलीज होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

Web Title: Kareena Kapoor's entry in Yash's 'Toxic', will play this role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.