शूटिंगदरम्यान चुकून निघाले कपडे, न्यूड सीन शूट झाला अन्...; सिनेमा रिलीज होताच अभिनेत्रीने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 13:15 IST2025-04-07T13:14:28+5:302025-04-07T13:15:32+5:30
एका लोकप्रिय अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आत्महत्या केली होती. खरेतर अभिनेत्रीचा न्यूड सीन तिच्या परवानगीशिवाय चित्रपटात ठेवण्यात आला होता.

शूटिंगदरम्यान चुकून निघाले कपडे, न्यूड सीन शूट झाला अन्...; सिनेमा रिलीज होताच अभिनेत्रीने संपवलं जीवन
साउथ सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर सिनेविश्वात खळबळ उडाली होती. खरेतर, या अभिनेत्रीने तिच्या चित्रपट निर्मात्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आपले जीवन संपवावे लागले. निर्मात्यांनी परवानगीशिवाय या अभिनेत्रीचा एक न्यूड सीन चित्रपटात टाकला, ज्याचा धक्का तिला सहन झाला नाही.
साउथ अभिनेत्री विजयश्रीचा जन्म १९५३ साली झाला होता आणि तिने वयाच्या १३व्या वर्षी १९६६ साली 'चिट्ठी' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यात तिची भूमिका छोटी होती, पण तिने आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. विजयश्रीने तिच्या कमी कारकीर्दीतदेखील दमदार सिनेमे केले होते. ती खूप सुंदर होती, तिला लोक मर्लिन मुनरोदेखील म्हणायचे. मात्र कोणाला माहित नव्हते की, ही रायझिंग स्टार लवकरच जगाचा निरोप घेईल.
वयाच्या २१व्या वर्षी करावी लागली आत्महत्या
विजयश्रीसोबत असं काही घडलं, ज्यामुळे तिला वयाच्या २१व्या वर्षी आत्महत्या करावी लागली. खरेतर विजयश्रीने १९७३ साली 'पोन्नापोरम कोट्टा' सिनेमाचे शूटिंग करत होती. शूटिंगदरम्याने विजयश्रीला झऱ्याखाली आंघोळ करायचा सीन करायचा होता. यादरम्यान झऱ्याचे पाणी जोरात वाहू लागले आणि तिचे कपडे अंगावरुन घसरले. मात्र तिने ही परिस्थिती सांभाळून घेतली आणि शूटिंग पूर्ण केले.
या घटनेमुळे ती झाली खूप अस्वस्थ
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा विजयश्रीचे कपडे घसरले तेव्हाही कॅमेरामनने शूटिंग थांबवले नाही आणि तिचा न्यूड सीन रेकॉर्ड केला. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा विजयश्रीचा न्यूड सीन चित्रपटात परवानगीशिवाय ठेवण्यात आला होता. तिचा न्यूड सीन पाहिल्यानंतर 'पोन्नापोरम कोट्टा' चित्रपटातील विजयश्रीने दिग्दर्शकाला चित्रपटातून हा सीन काढून टाकण्यास सांगितले पण तसे झाले नाही. या घटनेमुळे ती खूप अस्वस्थ झाली आणि तिने आत्महत्या केली. विजयश्रीच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. चित्रपटाचा कॅमेरामन विजयश्रीला ब्लॅकमेल करत होता, असे सांगण्यात येते. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जाते.