'दृश्यम' पेक्षा १०० पट सरस सस्पेन्स, क्लायमॅक्स पाहून तुम्ही थक्क व्हाल, ७.८ रेटिंग असलेल्या या सिनेमाबद्दल तुम्हाला माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 16:28 IST2025-09-05T16:26:07+5:302025-09-05T16:28:25+5:30
आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा अजय देवगणच्या 'दृश्यम'पेक्षा १०० पट अधिक दमदार आहे. चित्रपटाचे शेवटचे १८ मिनिटे तुम्हाला थक्क करून सोडतील.

'दृश्यम' पेक्षा १०० पट सरस सस्पेन्स, क्लायमॅक्स पाहून तुम्ही थक्क व्हाल, ७.८ रेटिंग असलेल्या या सिनेमाबद्दल तुम्हाला माहितीये का?
आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याची कथा अजय देवगण(Ajay Devgan)च्या 'दृश्यम'पेक्षा १०० पट अधिक दमदार आहे. चित्रपटाचे शेवटचे १८ मिनिटे तुम्हाला थक्क करून सोडतील. सध्या ओटीटीवर २ तास २३ मिनिटांचा हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने कोणत्याही प्रमोशनशिवाय बॉक्स ऑफिसवर बजेटच्या चारपट कमाई करून सर्वांना चकित केले आहे. आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव 'सूक्ष्मदर्शिनी' (Sookshmadarshini Movie) आहे.
२०२४ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट 'सूक्ष्मदर्शिनी'मध्ये बासिल जोसेफ आणि नाझरिया नझीम मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा इंटरव्हल नंतर पूर्णपणे वेगळे वळण घेते आणि क्लायमॅक्समध्ये एक धक्कादायक रहस्य उघड होते. या चित्रपटाची कथा प्रियादर्शिनी (प्रिया) नावाच्या एका सामान्य गृहिणीभोवती फिरते. ती तिचा पती अँटनी आणि मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत असते. पण त्यांच्या कॉलनीत मॅन्युअल नावाचा एक माणूस आपल्या आई ग्रेससोबत राहायला येतो आणि त्यांच्या शांत जीवनात व्यत्यय येतो.
मॅन्युअल 'ग्रेस बेकर्स' नावाने एक बेकरी उघडतो आणि शांतपणे आपले काम करतो. पण त्याच्या विचित्र हालचाली प्रियाला आकर्षित करतात. सुरुवातीला ती याकडे दुर्लक्ष करते, पण हळूहळू तिला मॅन्युअलवर संशय येऊ लागतो. ती आपल्या खिडकीतून मॅन्युअलच्या घरातील काही संशयास्पद गोष्टी पाहते. अचानक, आई बेपत्ता झाल्यावर मॅन्युअल सांगतो की तिला अल्झायमर (स्मृतिभ्रंश) आहे आणि म्हणूनच ती कुठेतरी निघून गेली आहे. पण प्रियाला वाटते की यामागे नक्कीच काहीतरी मोठे रहस्य आहे. ती सत्य शोधण्याचा निर्णय घेते आणि स्वतः तपास सुरू करते. तिला मिळणारे प्रत्येक धागेदोरे तिला कॉलनीत लपलेल्या रहस्यांकडे घेऊन जातात.
'सूक्ष्मदर्शिनी' बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर
फक्त १४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'सूक्ष्मदर्शिनी' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरून सर्वांना चकीत केले. या चित्रपटाने भारतात २७.९२ कोटी रुपये आणि परदेशात २२.२५ कोटी रुपये कमावले. जगभरात चित्रपटाने एकूण ५४.३६ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. या चित्रपटाचे यश केवळ 'वर्ड ऑफ माउथ' (तोंडी प्रसिद्धी) मुळे शक्य झाले. या चित्रपटाला IMDb वर १० पैकी ७.८ रेटिंग मिळाले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर 'सूक्ष्मदर्शिनी' हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध आहे.
'सूक्ष्मदर्शिनी'मध्ये बासिल जोसेफ आणि नाझरिया नझीम यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. सस्पेन्स, विनोद आणि भावनांचा योग्य मिलाफ हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. 'सूक्ष्मदर्शिनी' चित्रपटाचे दिग्दर्शन एम.सी. जितीन यांनी केले आहे.